मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जोनास पोहोचलेत लंडनला! फॅमिलीसोबत घालवला वेळ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:04 PM2018-12-23T14:04:23+5:302018-12-23T14:06:51+5:30

 प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

priyanka chopra and nick jonas go on a family dinner with sophie turner and joe jonas in london | मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जोनास पोहोचलेत लंडनला! फॅमिलीसोबत घालवला वेळ!!

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जोनास पोहोचलेत लंडनला! फॅमिलीसोबत घालवला वेळ!!

googlenewsNext

 प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत, प्रियांका, निक, निकचा भाऊ जो जोनास आणि त्याची पार्टनर सोफी टर्नर असे सगळे आहेत. प्रियांकाची आई मधू चोप्राही या फोटोत दिसतेय.

निकयांका लग्नाआधीपासून चर्चेत आहेत. लग्न झाल्यानंतर तर हे कपल आणखीच चर्चेत आले. नुकतचे मुंबईत निकयांकाचे वेडिंग रिसेप्शन झाले. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी धम्माल मस्ती, नाचगाणे झाले. याचे इनसाईड व्हिडिओ आपण पाहिलेच. यावर्षी आॅगस्टमध्ये निकयांकाचा मुंबईत ‘रोका’ झाला होता. यानंतर गत १ व २ डिसेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकले.

जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला.प्रियांका व निक दोघेही ग्लोबल स्टार असल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. निक एक हॉलिवूड सिंगर आहे आणि प्रियांकाने अनेक हॉलिवूड चित्रपटांत काम केले आहे. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे. लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या यापूर्वी ह्यसात खून माफह्ण या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती.

Web Title: priyanka chopra and nick jonas go on a family dinner with sophie turner and joe jonas in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.