ख्रिसमसची जादू पसरली प्रियंका चोप्रावर, सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 04:32 PM2020-12-25T16:32:53+5:302020-12-25T16:40:16+5:30

ख्रिसमस सेलिब्रेशनसोबत मौजमस्तीमध्येही प्रियंका दंग आहे. ख्रिसमसचा आनंद प्रियंकाच्या चेह-यावर ओसंडून वाहतोय. सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Priyanka Chopra And Nick Jonas Celebrated Christmas 2020 In London Photos Goes Viral | ख्रिसमसची जादू पसरली प्रियंका चोप्रावर, सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याचे फोटो आले समोर

ख्रिसमसची जादू पसरली प्रियंका चोप्रावर, सेलिब्रेशनमध्ये दंग असल्याचे फोटो आले समोर

googlenewsNext

ख्रिसमस म्हणजे सण आनंदाचा... सण जल्लोषाचा... सा-या जगावर सुखांची उधळण करणारा आणि सांताक्लॉजच्या आगमनाने आसंमतामध्ये चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे ख्रिसमस.....संपूर्ण जगात सध्या ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु आहे. मग बॉलिवूडचे कलाकार तरी कसे मागे राहातील. अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनाससह ख्रिसमस सेलिब्रेट करत आहे. प्रियांकाने आपल्या सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. प्रियांका सध्या लंडमंध्ये ख्रिसमस एन्जॉय करतेय. 

ख्रिसमस सेलिब्रेशनसोबत मौजमस्तीमध्येही प्रियंका दंग आहे. ख्रिसमसचा आनंद प्रियंकाच्या चेह-यावर ओसंडून वाहतोय. सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करत प्रियंकाने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.शेअर केलेल्या फोटोत निक आणि प्रियंकाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते भरघोस पसंती देतात. या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू आहे.


प्रियंका व निक सध्या लंडनमध्ये आहेत. प्रियंका तिथे ‘टेक्स फॉर यू’ या सिनेमाचे शूटींग करतेय. तिच्यासोबत निकसुद्धा या सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे शूटींगच्या निमित्ताने दोघेही लंडनमध्ये पोहोचले. कामाच्यावेळी काम आणि फावल्या वेळात भटकंती, असे करत दोघेही लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसले. यादरम्यान निक प्रियंकाचे भररस्त्यात फोटो काढताना दिसला.


प्रियंकाचा ‘टेक्स फॉर यू ’ हा सिनेमा एक रोमॅन्टिक ड्रामा आहे. अलीकडे प्रियंका निकला चक्क कारमधून उतरवत त्याला शिव्या घालते, असा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. पण हा ‘टेक्स फॉर यू ’ याच सिनेमातील एक सीन होता. जीम स्ट्रॉसे या प्रसिद्ध लेखकाने चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट एका जर्मन कादंबरीवरुन साकारण्यात येत आहे.

याशिवाय बॉलिवूडच्या एका सिनेमातही प्रियंका झळकणार आहे. ‘द व्हाइट टायगर’ असे या सिनेमाचे नाव आहे. यात प्र्रियंकासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत. अलीकडे या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा आहे. प्रियंका व राजकुमार रावचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Web Title: Priyanka Chopra And Nick Jonas Celebrated Christmas 2020 In London Photos Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.