प्रतिक बब्बर पहिल्यांदाच दिसणार वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 06:00 AM2019-01-20T06:00:00+5:302019-01-20T06:00:00+5:30

प्रतिक बब्बरने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला.

Pratiek babbar will seen amazon webseries | प्रतिक बब्बर पहिल्यांदाच दिसणार वेबसीरिजमध्ये

प्रतिक बब्बर पहिल्यांदाच दिसणार वेबसीरिजमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्दे प्रतिक अॅमोझॉन प्राईमच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे

प्रतिक बब्बरने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’, ‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतिक दिसला. लवकरच प्रतिक अॅमोझॉन प्राईमच्या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. 'फोर मोर शॉट्स प्लीज' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. प्रतिकची ही पहिलीच वेबसीरीज असल्याने तो याबाबत उत्साही आहे. मात्र त्याच्या भूमिकेबाबत अधिक माहिती अजून मिळू शकलेली नाही.   


फोर मोर शॉट्स प्लीजमध्ये प्रतीकसोबत सयानी गुप्ता, किर्ती कुल्हारी, बाजे, मिलिंद सोमण दिसणार आहेत. 25 जानेवारीला 200 पेक्षा जास्त देशात रिलीज करण्यात येणार आहे. 


लवकरच प्रतिक गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. गतवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्ताला म्हणजेच २२ जानेवारीला प्रतीक व सान्याचा साखरपुडा झाला होता. यानंतर बरोबर वर्षभरानी म्हणजेच येत्या २२ व २३ जानेवारीला प्रतिक व सान्या विवाहबद्ध होत आहेत. लखनौत हा विवाह सोहळा होणार आहे. यानंतर मुंबईत या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.  


गेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत दोन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सान्या ही मूळची लखनौची आहे.  सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या साखरपुड्याच्या सहा महिन्यांपूर्वीच लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली होती.

Web Title: Pratiek babbar will seen amazon webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.