जेव्हा प्रतिक बब्बरने बायकोसह न्यूड फोटो शेअर करत माजवली होती खळबळ,आता केला DELETE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 04:26 PM2020-04-03T16:26:23+5:302020-04-03T16:27:14+5:30

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा प्रतीक बब्बर मुलगा आहे.

Prateik Babbar Deletes Semi-Nude Picture With Wife Sanya Sagar-SRJ | जेव्हा प्रतिक बब्बरने बायकोसह न्यूड फोटो शेअर करत माजवली होती खळबळ,आता केला DELETE

जेव्हा प्रतिक बब्बरने बायकोसह न्यूड फोटो शेअर करत माजवली होती खळबळ,आता केला DELETE

googlenewsNext

चित्रपटसृष्टीत दिवसागणिक नाती कशी बदलतात हे सांगणं कठीण. आज रिलेशनशिपमध्ये असणारे कपल उद्या एकत्र दिसतीलच असं नाही. त्यामुळेच कितने अजीब रिश्ते है यहाँ पे या गाण्याच्याओळी सेलिब्रिटींसाठी तंतोतंत लागू पडतात. असं काहीसं प्रतिक बब्बरसह घडले आहे. विशेष म्हणजे लाईमलाइटमध्ये राहण्यासाठी कलाकार मंडळी काय करतील याचा काय नेम नाही. लग्न ठरल्यापासून ते हनिमूनपर्यंत प्रतिक बब्बर त्याच्या सगळ्या अपडेस सोशल मीडियावर शेअर करायचा. त्याच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना चांहत्यांची खूप चांगली पसंती मिळायची तर कधी याच फोटोंमुळे तो खूप ट्रोलही व्हायचा.

लग्नापासून ते हनिमूनपर्यंत ठिक होते पण जेव्हा प्रतिकने काही गोष्टींची हद्द पार करत पब्लिकली अशा गोष्टी सर्रास सोशल मीडियावर शेअर केल्या तेव्हा मात्र त्याच्यावर जोरदार टिका करण्यात आली होती. अशोभनीय असे वर्तन असल्याचेही त्याच्यावर बोलले गेले. प्रतिकने पत्नी सान्या सागरसह न्यूड फोटो चक्क सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोने प्रचंड खळबळ देखील माजली होती. नेहमी कामापेक्षा हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असणारा प्रतिक बब्बर आज मात्र पत्नीपासून वेगळा राहत आहे. प्रतीक बब्बरच्या वैवाहिक आयुष्यात वादळ; वर्षभरातच लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे.

प्रतीकने 23 जानेवारी 2019 रोजी सान्या सागरसोबत लग्न केले होते, परंतु आता त्यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत आहेत. नात्यात दुरावा आणि कटुता आल्यामुळे प्रतीकने सान्यासोबतची रोमँटिक फोटो  इंस्टाग्रामवरुन डिलीट केली आहेत. एकमेकांना सोशल मीडिआवरून अनफॉलो देखील केले आहेत. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा प्रतीक बब्बर मुलगा  आहे.

Web Title: Prateik Babbar Deletes Semi-Nude Picture With Wife Sanya Sagar-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.