बॉलिवूडमध्ये खलनायकांच्या भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते प्राण यांची नुकतीच पुण्यतिथी पार पडली. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये ३५० चित्रपटात काम केले होते. प्राण हे त्यांच्या काळातील सर्वात महागडे खलनायक होते. मात्र तुम्हाला माहित आहे का की त्यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं.

अभिनेते प्राण आपल्यामध्ये आज नसले तरी त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. प्राण यांनी १९४० ते १९९० या काळात खलनायक व चरित्र भूमिका निभावून लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये ३५० चित्रपटात काम केले होते.


प्राण हे त्यांच्या काळातील सर्वात महागडे खलनायक होते. मात्र त्यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी फक्त १ रुपया मानधन घेतलं होतं. त्यांनी बॉबी चित्रपट फक्त एक रुपयात साईन केला होता. या मागचं कारणही इंटरेस्टिंग आहे. खरंतर राज कपूर चित्रपट बॉबीमध्ये ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेसाठी कास्ट करणार होते. मात्र ते प्राण यांना खूप मानधन देऊ शकत नव्हते. मेरा नाम जोकर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता.त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते प्राण यांना जास्त मानधन देऊ शकत नव्हते. हे कारण समजल्यावर प्राण बॉबी चित्रपटात फक्त एक रुपयांत काम करण्यास तयार झाले होते.


प्राण यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील करियरबद्दल आपल्या वडिलांना सांगितलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या बहिणीला ज्या वर्तमानपत्रात छापून आलेली मुलाखत वडिलांपासून लपवून ठेवायला सांगितलं होतं.

ते त्यांच्या काळात राजेश खन्ना यांच्यानंतर सर्वात जास्त कमाई करणारे दुसरे बॉलिवूड अभिनेते होते.

मुंबईत येण्यापूर्वी प्राण यांनी बावीस चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती. 


Web Title: Pran had took only 1 rupees for this movie, this is the reason behind this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.