Saaho Box Office Collection: साहोची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम, आतापर्यंत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:10 PM2019-09-04T15:10:12+5:302019-09-04T15:11:11+5:30

प्रभास बहुप्रतिक्षित साहो गेल्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.

Prabhas starrer saaho fifth day box office colection 9 crore 10 lakh | Saaho Box Office Collection: साहोची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम, आतापर्यंत कमावले इतके कोटी

Saaho Box Office Collection: साहोची बॉक्स ऑफिसवरील घौडदौड कायम, आतापर्यंत कमावले इतके कोटी

googlenewsNext

प्रभास बहुप्रतिक्षित साहो गेल्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप चांगली कमाई केली आहे. . हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामीळ अशा तीन विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पाचव्या दिवशी या सिनेमाने 9.10 कोटींची केली आणि सिनेमा आता 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील झाला आहे. शुक्रवारी या सिनेमाने 24.40 कोटी, शनिवारी 25.20 कोटी, रविवारी 9.48 कोटी, सोमवारी 14.20 कोटी तर मंगळवारी 9.10 कोटींची कमाई केली. 

 



 

साहो या चित्रपटात प्रभाससोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अर्जुन विजय, एवलिन शर्मा, टीनू आनंद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण नंतर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2 तास 51 मिनिटांच्या या चित्रपटात प्रभास जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. साहोला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नसल्या तरी सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूपच चांगले रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर ‘साहो’चे काही रिव्ह्यू  व्हायरल होत आहेत. बुधवारी युएईमध्ये ‘साहो’चे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यात प्रभासच्या दमदार अ‍ॅक्टिंग आणि अ‍ॅक्शनची प्रचंड कौतुक केले गेले आहे. पण चित्रपटाची कथा, व्हीएफएक्स क्वालिटीवर टीकाही झाली. काहींनी हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.
 

Web Title: Prabhas starrer saaho fifth day box office colection 9 crore 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Saaho Movieसाहो