'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:48 AM2020-08-18T09:48:55+5:302020-08-18T09:51:55+5:30

प्रभासच्या या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभास गेल्या रात्री एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती.

Prabhas new film announcement named Adipurush first look poster out, Om Raut will direct movie | 'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

'बाहुबली' प्रभासच्या नव्या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर रिलीज, 'तानाजी' फेम दिग्दर्शक ओम राऊतचं दिग्दर्शन!

googlenewsNext

बाहुबली प्रभासने त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. आदिपुरूष असं त्याच्या नव्या सिनेमां नाव असून याचं दिग्दर्शन 'तानाजी' फेम ओम राऊत करणार आहे. त्याने दिग्दर्शित केलेला आणि अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला 'तानाजी' हा सुपरडुपर हिट ठरला होता. प्रभासने इन्स्टावर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. हा सिनेमा एक थ्रीडी अॅक्शन ड्रामा असेल. तसेच हा सिनेमा हिंदी सहीत तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होईल. हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

'आदिपुरूष'चं पोस्टर शेअर करत प्रभासने लिहिले की, वाईटावर मात करण्याचा आनंद साजरा करताना....या सिनेमात प्रभास आदिपुरूष ची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं पोस्टर जरी रिलीज केलं असलं तरी यातील प्रभासच्या लूकबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. 

प्रभासच्या या सिनेमाची घोषणा मंगळवारी सकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी झाली. प्रभास गेल्या रात्री एक व्हिडीओ शेअर करत या सिनेमाच्या घोषणेबाबत हिंट दिली होती.

प्रभासचे अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. त्याच्या दीपिकासोबतच्या सिनेमाची चर्चा बरीच रंगली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नाग अश्विन करणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रभास आणि दीपिका एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाच्या टायटलचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.

दुसरीकडे प्रभासचा आणखी एक चर्चेतील सिनेमा म्हणजे राधे श्याम. यात तो पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. या सिनेमाबाबत त्याचे फॅन्स फारच उत्साहित आहेत. प्रभासच्या आधीच्या साहो सिनेमाला समीक्षकांकडून फारश्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नव्हत्या. पण सिनेमाने कमाई चांगलीच केली होती.

हे पण वाचा :

दीपिका पादुकोनसोबतच्या सिनेमासाठी प्रभास घेणार रेकॉर्ड ब्रेक मानधन, किती ते वाचून चक्रावून जाल...

Web Title: Prabhas new film announcement named Adipurush first look poster out, Om Raut will direct movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.