‘बाहुबली’चा कौतुकास्पद उपक्रम ! सुपरस्टार प्रभासने दत्तक घेतले जंगल, दिली 2 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 12:51 PM2020-09-08T12:51:27+5:302020-09-08T12:52:31+5:30

प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Prabhas has come forward to adopt 1,650 acres of reserve forest on the outskirts of Hyderabad | ‘बाहुबली’चा कौतुकास्पद उपक्रम ! सुपरस्टार प्रभासने दत्तक घेतले जंगल, दिली 2 कोटींची मदत

‘बाहुबली’चा कौतुकास्पद उपक्रम ! सुपरस्टार प्रभासने दत्तक घेतले जंगल, दिली 2 कोटींची मदत

googlenewsNext
ठळक मुद्देबाहुबली प्रभास लवकरच   दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात झळकणार आहे.

‘बाहुबली’ या सिनेमानंतर साऊथ सुपरस्टार प्रभास चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. ‘बाहुबली’नंतर प्रभासची लोकप्रियता कधी नव्हे इतकी वाढली. त्याचे जगभर कौतुक झाले. पण सध्या प्रभासवर एका वेगळ्या कारणासाठी कौतुकाचा वर्षाव होतोय. त्याने हाती घेतलेला एक उपक्रम पाहता लोक त्याच्या प्रेमात पडले आहेत. प्रभासने असे काय केले तर, 1650 एकर राखीव वनक्षेत्र दत्तक घेतले. शिवाय या जंगलाच्या विकासासाठी 2 कोटींची मदतही जाहीर केली.
प्रभासने स्वत: इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
हैदराबादजवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र प्रभासने दत्तक घेतले आहे. या वनक्षेत्राच्या विकासाठी संपूर्ण जबाबदारी घेत, तूर्तास यासाठी त्याने दोन कोटी रुपयाची मदत वन अधिका-यांना देऊ केली आहे.

‘मी हैदराबादजवळील काझिपल्ली राखीव वनक्षेत्रातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.  यामुळे शहरासाठी एक Lung Space तयार होईल, असा  निसर्गप्रेमी या नात्याने मला विश्वास आहे. मी राज्यसभा खासदार संतोष कुमार यांचे  आभार मानतो. त्याचप्रमाणे तेलंगणा सरकारचे आणि वनविभागाचेही मला ही संधी देण्यासाठी मी आभार मानू इच्छितो, असे व्हिडीओ शेअर करताना प्रभासने म्हटले आहे.

महेश बाबू ते प्रभास...! जाणून घ्या साऊथच्या या 14 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’

 जिम ट्रेनरला दिली महागडी कार

नुकतीच प्रभासने त्याच्या जिम ट्रेनरला 89 लाख रूपयांची रेंज रोव्हर वेलर कार भेट दिली.  जिम ट्रेनर लक्ष्मण रेड्डी अनेक वर्षांपासून प्रभाससाठी काम करतोय. प्रभास त्याला त्याच्या आयुष्यातील खास व्यक्ति मानतो. लक्ष्मण हा 2010 मध्ये मिस्टर वर्ल्ड राहिलेला आहे.

‘आदिपुरूष’ या सिनेमात दिसणार प्रभासचा जलवा

बाहुबली प्रभास लवकरच   दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. या भव्यदिव्य चित्रपटात सैफ अली खानची देखील वर्णी लागली असून तो यात रावणाची भूमिका साकारणार आहेत. 
या चित्रपटाच्या निमित्ताने प्रभास आणि ओम राऊत पहिल्यांदा एकत्र काम करणार असून पुरातन भारतीय संस्कृती आणि पुराणावर आधारित हा चित्रपट थ्री डी रूपामध्ये हिंदी, तेलुगू , तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेसह अनेक विदेशी भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. दुष्ट शक्तीवर सत्याच्या-चांगल्या शक्तीचा विजय अशी चित्रपटची संकल्पना आहे. 
आदिपुरुष हा प्रभासचा 22 वा चित्रपट आहे. या अभूतपूर्व, बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटची निर्मिती भूषण कुमार यांच्या टी-सिरीज आणि रेट्रोफाइलच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे असून 2022 साली प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
 

Web Title: Prabhas has come forward to adopt 1,650 acres of reserve forest on the outskirts of Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास