प्रभास बनला सगळ्यात महागडा अभिनेता, 'साहो'साठी घेतलेली रक्कम वाचून तुमचे डोळे पडतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 05:04 PM2019-08-05T17:04:02+5:302019-08-05T17:12:14+5:30

 प्रभासचा साहो सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसणार आहे.

Prabhas get whopping fee for saaho makes them highest paid indian actor | प्रभास बनला सगळ्यात महागडा अभिनेता, 'साहो'साठी घेतलेली रक्कम वाचून तुमचे डोळे पडतील पांढरे

प्रभास बनला सगळ्यात महागडा अभिनेता, 'साहो'साठी घेतलेली रक्कम वाचून तुमचे डोळे पडतील पांढरे

googlenewsNext

 प्रभासचासाहो सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसणार आहे. या सिनेमातून श्रद्धा तेलुगू इंडस्ट्री डेब्यू करतेय. साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय. या सिनेमात काम करण्यासाठी  प्रभास आणि श्रद्धा कपूरने भलीमोठी रक्कम आकारली आहे. 


आजतकच्या रिपोर्टनुसार प्रभासने 100 कोटींचे मानधन घेतल्याची माहिती आहे. या मानधनासोबत प्रभास फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात महागडा स्टार बनला आहे. त्याने रजनीकांत, सलमान खान आणि शाहरुख खान यांना देखील मागे सोडले आहे.  रिपोर्टनुसार प्रभास साहोच्या प्री-रिलीज बिझनेसमध्ये 50 % हिस्सा घेणार आहे. मात्र याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही.  श्रद्धाने या सिनेमासाठी 7 कोटी रुपांयाचे मानधन घेतले आहे.  


'साहो'बाबत बोलायचे झाले तर त्यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे.

प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच श्रद्धा कपूर, नील नीतिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Prabhas get whopping fee for saaho makes them highest paid indian actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.