Prabhas film saaho earned 320 crore before its release theatrical rights | काय सांगता प्रभासच्या साहोने रिलीज आधीच कमावले 320 कोटी, कसे ते वाचा!
काय सांगता प्रभासच्या साहोने रिलीज आधीच कमावले 320 कोटी, कसे ते वाचा!

 साऊथचा सुपरस्टार प्रभासचा 'सोहा'ला घेऊन त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ आहे. साहो या महिन्याच्या 30 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार बिग बजेट असलेल्या साहोने रिलीज आधीच 320 कोटींची कमाई केली आहे. रिपोर्टनुसार मेकर्सनी साहोचे थियेट्रिकल राईट्स 320 कोटींना विकले आहेत. मेकर्सनी साहोचे सेटलाईट राईट्स विकलेले नाहीत.  बाहुबलीनंतर साहो हा प्रभासचा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने पाहतायेत.  


सध्या प्रभास आणि श्रद्धा साहोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत.  साहोकडे 2019 मधला सर्वात बिग बजेट सिनेमा म्हणून पाहिलं जातंय.

या सिनेमात काम करण्यासाठी  प्रभास आणि श्रद्धा कपूरने भलीमोठी रक्कम आकारली आहे.  रिपोर्टनुसार प्रभासने 100 कोटींचे मानधन घेतल्याची माहिती आहे. या मानधनासोबत प्रभास फिल्म इंडस्ट्रीमधील सगळ्यात महागडा स्टार बनला आहे.

प्रभासचे यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. 

English summary :
Saaho Movie: Saaho will be meeting the audience on the 30th august 2019. As per report, the release of the Big Budget Sahoo has already generated Rs 320 crore. According to reports, Makers has sold Saaho's theatrical rights to 320 crore.


Web Title: Prabhas film saaho earned 320 crore before its release theatrical rights
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.