'...तर मी आत्महत्या करेन'; प्रभासला लेटर लिहित चाहत्याने केली विचित्र मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 02:06 PM2022-05-16T14:06:36+5:302022-05-16T14:06:56+5:30

Prabhas: प्रभास लवकरच 'सालार' या चित्रपटात झळकणार आहे. मात्र, मधल्या काळात या चित्रपटाविषयी कोणतीही अपडेट समोर न आल्यामुळे एका चाहता चांगलाच त्रस्त झाला आहे.

prabhas fan threatened to end life if no update on his upcoming film salaar shocking | '...तर मी आत्महत्या करेन'; प्रभासला लेटर लिहित चाहत्याने केली विचित्र मागणी

'...तर मी आत्महत्या करेन'; प्रभासला लेटर लिहित चाहत्याने केली विचित्र मागणी

googlenewsNext

दाक्षिणात्य कलाविश्वातील बाहुबली अर्थात अभिनेता प्रभास  (prabhas) याची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. बाहुबलीमुळे प्रभास केवळ साऊथ पूरता मर्यादित न राहता त्याची क्रेझ बॉलिवूडमध्येही निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक चित्रपटाची, त्याच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे अनेकदा आपल्या लाडक्या कलाकाराला पाहण्यासाठी वा त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करायला तयार होतात. असाच एक प्रभासचा चाहता सध्या चर्चेत आला आहे. या चाहत्याने प्रभासला थेट आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.

प्रभास लवकरच 'सालार' या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. मात्र, मधल्या काळात या चित्रपटाविषयी कोणतीही अपडेट समोर न आल्यामुळे एका चाहता चांगलाच त्रस्त झाला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचे अपडेट्स न दिल्यास आत्महत्या करु अशी धमकीदेखील या चाहत्याने पत्राच्या माध्यमातून दिली आहे.

काय आहे चाहत्याचं पत्र?

मी प्रचंड निराश आहे. कारण, साहो, राधेश्याम आणि प्रभासच्या यापूर्वीच्या प्रत्येक चित्रपटांच्या वेळी हेच झालं होतं. जर आम्हाला या महिन्यात सालारचे कोणतेही अपडेट्स मिळाले नाहीत तर मी नक्कीच आत्महत्या करेन. आम्हाला सालारचे अपडेट्स पाहिजेत. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी म्हटलं होतं की, सालारचे अपडेट लवकरात लवकर देऊ. पण, आता त्या गोष्टीलाही महिना उलटून गेला आहे. मात्र, तरीदेखील काहीही अपडेट्स नाहीत, असं या चाहत्याने त्याच्या पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, सालार हा प्रभासच्या करिअरमधील मोठा चित्रपट असल्याचं सांगण्यात येतं. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रशांत नीलने केलं असून या चित्रपटाचं चित्रीकरण २०२२मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात प्रभाससह श्रुती हसन, दिशा पाटनी, जगपति बाबू ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत 

Web Title: prabhas fan threatened to end life if no update on his upcoming film salaar shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.