सातासमुद्रापार 'राधे'चा बोलबाला, सलमान खानच्या चित्रपटाने कमाविला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:42 PM2021-05-15T21:42:54+5:302021-05-15T21:43:26+5:30

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाई ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.

The popularity of 'Radhe' across the seas, Salman Khan's film has earned so many crores | सातासमुद्रापार 'राधे'चा बोलबाला, सलमान खानच्या चित्रपटाने कमाविला इतक्या कोटींचा गल्ला

सातासमुद्रापार 'राधे'चा बोलबाला, सलमान खानच्या चित्रपटाने कमाविला इतक्या कोटींचा गल्ला

googlenewsNext

सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट राधेः योर मोस्ट वॉण्टेड भाई ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा चित्रपट कोरोना संकटामुळे भारतात चित्रपटगृहाऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. मात्र दुबई ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. 
भारताप्रमाणेच विदेशात प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'राधे' चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळतो आहे. 

ऑस्ट्रेलिया बॉक्स ऑफिसच्या दुसर्‍या दिवसाच्या दिवशी ६९ स्क्रिन कलेक्शन ७४ हजार ९६६ डॉलर म्हणजेच ५४.९३ लाख रूपयांपर्यंत पोहोचले आहे. न्यूझीलंडमधील २६ स्क्रिनचे कलेक्शन १३ हजार ६०७ डॉलर म्हणजेच ९.९७ लाख रूपयांपर्यंत पोहोचले आहे.

राधेने दोन दिवसांत ६४.९ लाखांचा गल्ला जमवला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगलीच मजल मारली आहे. दुबईमध्ये देखील पहिल्या प्रीमिअरच्या वेळी चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'राधे' चित्रपटाने दुबईत ४० लाख डॉलर म्हणजे २.९१ कोटींचा बिझनेस केला आहे.


ईदला प्रदर्शित झालेला सलमान खानचा राधे चित्रपट सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ४.२ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सलमान खानने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ‘तुम्हाला ईदच्या खूप खूप शुभेच्छा. राधे हा चित्रपट पहिल्याच दिवशी सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे. तुम्हा सर्वांचे आभार’ असे त्याने कॅप्शन दिले आहे.

Web Title: The popularity of 'Radhe' across the seas, Salman Khan's film has earned so many crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.