प्रसिद्ध गायक-संगीतकार अनू मलिक यांची मुलगी अदा पदार्पण करणार बॉलिवूडमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 06:54 AM2017-03-09T06:54:24+5:302017-03-09T12:24:24+5:30

चित्रपटसृष्टीत आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा ट्रेंड तसा जुनाच.. अनेक सेलिब्रिटी किड्सनी 'हम भी कुछ कम नहीं' हेच ...

Popular Bollywood singer-musician Anu Malik's daughter will make debut in Bollywood? | प्रसिद्ध गायक-संगीतकार अनू मलिक यांची मुलगी अदा पदार्पण करणार बॉलिवूडमध्ये?

प्रसिद्ध गायक-संगीतकार अनू मलिक यांची मुलगी अदा पदार्पण करणार बॉलिवूडमध्ये?

googlenewsNext
त्रपटसृष्टीत आईवडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा ट्रेंड तसा जुनाच.. अनेक सेलिब्रिटी किड्सनी 'हम भी कुछ कम नहीं' हेच दाखवून दिलंय.आता प्रसिद्ध गायक-संगीतकार अनू मलिक यांची मुलगी अदा ही बॉलिवूडमध्ये पदापर्ण करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे कळतंय.अनू मलिक यांना अदा आणि अनमोल या दोन मुली आहेत. यांत अदाही त्यांची लहान मुलगी आहे. अदाला फॅशनची खूप आवड असल्यामुळे ती तिचे वेगवेगळे लुक करत,स्टायलिश कपडे परिधान करत स्टायलिश फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. सध्या न्यूयॉर्कच्या प्सन स्कूल ऑफ डिझाइन येथून ती फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे.मात्र तिचे शिक्षण संपल्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळणार असल्याचे बोलले जात आहे. एका कार्यक्रमात खुद्द अनू मलिक यांनीच त्यांच्या मुलींना त्यांच्या करिअरमध्ये काय करायचे आहे. यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अदाला फॅशनसह अभिनय क्षेत्राचीही खूप आवड असल्याचे त्यांनी म्हटले होते. देवाच्या कृपेन चांगल्या ऑफर्स आल्या तर अदाही सिनेमात झळणार असल्याचे अनू मलिक यांनी म्हटले होते. सध्या अदाने एक फोटोशूट केले आहे.त्यांत अतिशय सुंदर दिसत असून अगदी एका बार्बी डॉलप्रमाणेच ती दिसतेय.या फोटोशूटमधले काही निवडक फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रमावर शेअर केले आहे. तिच्या या फोटोजना तिला खूप चांगल्या प्रतिक्रीयाही मिळत असून तू सिनेमात कधी झळकणार असेही अनेक प्रश्न तिला विचारले जात आहेत. 

Web Title: Popular Bollywood singer-musician Anu Malik's daughter will make debut in Bollywood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.