पूनम पांडेने उचलले हे धक्कादायक पाऊल, तिचे चाहते असाल तर होईल तुमची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:47 AM2020-12-26T11:47:19+5:302020-12-26T11:52:47+5:30

पूनमच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिने हा निर्णय का घेतला आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

poonam pandey deleted her instagram account | पूनम पांडेने उचलले हे धक्कादायक पाऊल, तिचे चाहते असाल तर होईल तुमची निराशा

पूनम पांडेने उचलले हे धक्कादायक पाऊल, तिचे चाहते असाल तर होईल तुमची निराशा

Next
ठळक मुद्दे पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला प्रचंड संख्येने लोक फॉलो करतात.

अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो आमि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. पूनमने पोस्ट केलेल्या या व्हिडिओंवर आणि फोटोवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट करत असतात. यातील काही काही कमेंट या तिला नाव ठेवणाऱ्या तर काही तिच्या भन्नाट हॉट फिगरचे कौतुक करणाऱ्या असतात. पूनमने नववर्षाच्या निमित्ताने आता एक निर्णय घेतला आहे आणि या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिने हा निर्णय का घेतला आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला प्रचंड संख्येने लोक फॉलो करतात. पण आता तिने तिचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट डीलिट केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. तिचे फोटो, व्हिडिओज पाहायला मिळणार नसल्याने तिच्या फॅन्सना धक्का बसला आहे. पूनमचे इन्स्टाग्रामचे अकाऊंट व्हेरिफाईड आहे. पण आता तेच अकाऊंट तुम्ही शोधायला गेलात तर तिचे अकाऊंट आपल्याला मिळत नाही. कारण ते तिने डीलिट केले आहे.

पूनसोबतच तिचा पती सॅम बॉम्बेचे अकाऊंटदेखील इन्स्टाग्रामला दिसत नाहीये. पूनमने तिचे अकाऊंट डीलिट करण्याचे का ठरवले याविषयी अद्याप तरी काहीही कळले नाही. 

पूनम पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'द जर्नी ऑफ कर्मा'मध्ये शक्ती कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिने तेरा नशा यासारख्या चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

Web Title: poonam pandey deleted her instagram account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app