Poonam Pandey च्या अश्लील व्हिडीओवर भडकले यूजर्स, फळ विकत घेताना दिल्या व्हल्गर पोज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:55 PM2022-05-18T12:55:39+5:302022-05-18T12:56:39+5:30

Poonam Pandey : पूनम पांडे तिच्या कारने फळांची खरेदी करण्यासाठी आली होती. फळांच्या दुकानावर बघताच फोटोग्राफर्सनी तिला कॅमेरात कैद करणं सुरू केलं.

Poonam Pandey buying fruits with vulgar expressions users troll her watch viral video | Poonam Pandey च्या अश्लील व्हिडीओवर भडकले यूजर्स, फळ विकत घेताना दिल्या व्हल्गर पोज

Poonam Pandey च्या अश्लील व्हिडीओवर भडकले यूजर्स, फळ विकत घेताना दिल्या व्हल्गर पोज

googlenewsNext

नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी पूनम पांडे (Poonam Pandey) 'लॉक अप'मध्ये दिसल्यानंतर तिची पॉप्युलॅरिटी आणखीन वाढली आहे. शो संपला तरी पूनम पांडे सतत चर्चेत आहे. नुकतीच पूनम मुंबईतील रस्त्यावर फळं विकत घेताना दिसली. पण बोल्ड आणि सिजलिंग पूनमने फळं खरेदी करताना असं काही केलं की, सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय.

पूनम पांडे तिच्या कारने फळांची खरेदी करण्यासाठी आली होती. फळांच्या दुकानावर बघताच फोटोग्राफर्सनी तिला कॅमेरात कैद करणं सुरू केलं. तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पूनम पांडे आंबा हातात घेऊन चीभ बाहेर काढत अश्लील हावभाव करते.

रस्त्यावर फळांची खरेदी करताना पूनमने दिलेल्या या हावभावांमुळे सोशल मीडिया यूजर्सनी तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिला खेडबोल सुनावले आहेत. अनेकांनी तिला हे व्हल्गर असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने लिहिलं की, किती घाणेरडा चेहरा आहे.

पूनम पांडेच्या लूकबाबत सांगायचं तर फळांसोबत ती फारच सिजलिंग लूक कॅरी करताना दिसली. शॉर्ट बॉडीकॉन ड्रेसमध्ये पूनम फारच बोल्ड दिसत आहे. पण फळांसोबत तिने ज्याप्रकारे अश्लील हावभाव केले ते फॅन्सना अजिबात आवडलं नाही.
 

Web Title: Poonam Pandey buying fruits with vulgar expressions users troll her watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.