ठळक मुद्देपॅलोमा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 32.2 हजार फॉलोव्हर्स असून ती नेहमीच तिचे फोटो त्यावर पोस्ट करते. एवढेच नव्हे तर ती तिच्या योगा आणि व्यायामाचे देखील फोटो, व्हिडिओ पोस्ट करते. 

पूनम ढिल्लोन यांचा आज म्हणजेच 18 एप्रिलला वाढदिवस असून त्यांनी खूपच कमी वयात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या केवळ १६ वर्षांच्या असताना त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पूनम या मिस इंडिया झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. हा किताब मिळाल्यानंतर एका मासिकावर पूनम यांचा फोटो झळकला होता. हा फोटो यश चोप्रा यांनी पाहिला आणि त्रिशुल या चित्रपटासाठी त्यांनी पूनम यांची निवड केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. पहिल्याच चित्रपटात संजीव कुमार, अमिताभ बच्चन या दिग्गजांसोबत झळकण्याची संधी पूनम यांना मिळाली होती. या चित्रपटात त्यांची जोडी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत जमली होती. त्या दोघांवर चित्रीत झालेले गुपुची गुपुची गम गम हे गाणे चांगलेच गाजले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

पूनम ढिल्लोन या त्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्रिशूल या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात स्विमिंग सूट घातला होता. तसेच गिरफ्तार या चित्रपटातही त्या स्विमिंग सूट मध्ये दिसल्या होत्या. पूनम यांच्या इतकीच त्यांची मुलगी देखील सुंदर असून त्यांच्या मुलीचे नाव पॅलोमा ठकेरीया ढिल्लोन असे असून तिची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पॅलोमाचे शिक्षण मुंबईतील जमनाबाई नर्सी शाळेत झाले असून ती आता 24 वर्षांची आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करेल असा अंदाज तिचे फोटो पाहून नेहमीच लावला जातो. पॅलोमा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 32.2 हजार फॉलोव्हर्स असून ती नेहमीच तिचे फोटो त्यावर पोस्ट करते. एवढेच नव्हे तर ती तिच्या योगा आणि व्यायामाचे देखील फोटो, व्हिडिओ पोस्ट करते. 

पूनमचे निर्माते अशोक ठकेरीयासोबत लग्न झाले होते. त्या दोघांची ओळख एका होली पार्टीमध्ये झाली होती. त्या होळीच्या काहीच महिने आधी पूनम यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे होळी साजरी करायची नाही असेच त्यांनी ठरवले होते. पण काही मित्रांच्या आग्रहास्तव त्या एका होळी पार्टीला गेल्या होत्या. तिथे पूनम यांना पाहाताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले. काहीच दिवसांत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्र देखील सोडले. त्यांना पॅलोमा आणि अनमोल अशी दोन मुले आहेत. पण लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. अशोक हे चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच अभिनय देखील करतात. त्यांचा मुलगा अनमोल आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 


Web Title: Poonam Dhillon’s daughter is more gorgeous than her; see pictures
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.