पूजा भट्ट म्हणते, मी सती-सावित्री नाही, ना कधी बनणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 05:03 AM2017-12-22T05:03:45+5:302017-12-22T10:33:45+5:30

‘जख्म’,‘सडक’,‘जुनून’ यासारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री पूजा भट्ट  अ‍ॅक्टिंगसोबतच तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत राहिली आहे. पूजा सध्या मोठ्या पडद्यावर सक्रीय ...

Pooja Bhatt says, I am not a Sati-Savitri, nor will it ever happen! | पूजा भट्ट म्हणते, मी सती-सावित्री नाही, ना कधी बनणार!

पूजा भट्ट म्हणते, मी सती-सावित्री नाही, ना कधी बनणार!

googlenewsNext
ख्म’,‘सडक’,‘जुनून’ यासारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री पूजा भट्ट  अ‍ॅक्टिंगसोबतच तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत राहिली आहे. पूजा सध्या मोठ्या पडद्यावर सक्रीय नाही,पण म्हणून चर्चेतही नाही, असे तुम्ही मानत असाल तर तुम्ही चुकलात असेच म्हणावे लागेल. कारण चर्चेत कसे राहायचे हे पूजाला कळते. अलीकडे एका रेडिओ चॅनलच्या शोमध्ये पूजा पोहोचली आणि चर्चेत आली. होय, भारतातील महिलांच्या स्थितीवर ती अगदी बेधडक बोलली. भारतात महिलांचे उग्र रूप कुणालाही पाहायला आवडत नाही. येथे केवळ पुरूषांचा राग, संताप कुरवाळला जातो. माझे म्हणाल तर मी काही सतीसावित्री नाही आणि मला सती-सावित्री बनायचेही नाही, असे पूजा म्हणाली.



कुठलीही महिला स्वच्छ मन आणि बुद्धीने आपले मत मांडते तेव्हा तिचा संताप बोलतोय, असेच समाजाला वाटते. अगदी मी बोलते त्याच अंदाजात महेशजी ( पूजाचे वडिल महेश भट्ट) बोलतात. पण माझे बोलणे लोकांना असभ्य वाटते. याऊलट महेशजी किती इंटेंस बोलतात, असे लोक म्हणतात. माझ्यासारखी थोडी फार सुंदर महिला तिच्या सेक्शुअ‍ॅलिटीसोबत कम्फर्टेबल असते,  स्वत:ची मते मांडते, तेव्हा लोकांना ती अहंकारी वाटते. महिलांना केवळ ग्लॅमर पोजमध्ये आणि भोळ्या-भाबळ्या रूपातच पाहणे समाजाला आवडते. भारत एक विचित्र देश आहे. कुठलीही बाई लक्ष्मी, सीता, सावित्री बनून राहत असेल तर ती समाजाला हवी आहे. पण तिने कालीचे रूप धारण केले की, लोकांना त्रास व्हायला लागतो, असेही पूजा म्हणाली.
 मी आयुष्यात पूर्वापार माझ्या स्वत:च्या अटींवर जगले आहे. पुढेही असेच जगणार. लोकांनी मला सहन करो, न करो. मला फॉलो करो ना करो. पण मी विचार करणार, माझे विचार व्यक्त करणार आणि जशी आहे तशीच राहणार. हे माझे व्यक्तिमत्त्व आहे आणि माझे पिता महेश भट्ट यांच्याकडून वारसारूपात मला मिळाले आहे, असेही तिने स्पष्ट केले.

ALSO READ : ​महेश भट्ट सांगतायेत, या गोष्टीचा पूजा भट्टला झाला होता पश्चाताप

महेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर ‘सडक’, ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘चाहत’ या चित्रपटात ती दिसली. त्यानंतर मात्र दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात  तिने स्वत:ला झोकून दिले. 

Web Title: Pooja Bhatt says, I am not a Sati-Savitri, nor will it ever happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.