ठळक मुद्देमाझ्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर मी त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी माझ्या आईला एका दुसऱ्या महिलेसाठी सोडले त्याचा मला प्रचंड राग आला होता.

महेश भट आणि लोरेन ब्राईट यांना पूजा आणि राहुल अशी दोन मुले आहेत. पूजा अगदी लहान असताना महेश भट आणि लोरेन यांचा घटस्फोट झाला आणि महेश भट यांनी सोनी राजदान यांच्यासोबत लग्न केले. त्यांना आलिया आणि शाहिन या दोन मुली आहेत. आलियाची सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. 

सोनी राजदान यांच्या प्रेमात पडल्यामुळे महेश यांनी लोरेन यांना घटस्फोट दिला होता. आपल्या वडिलांनी एखाद्या दुसऱ्या महिलेसाठी आईला सोडले ही गोष्ट पूजाला पटली नव्हती. यामुळे ती महेश भट यांची दुसरी पत्नी सोनी यांचा तिरस्कार करायला लागली होती. तिनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते.

पूजाने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर मी त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी माझ्या आईला एका दुसऱ्या महिलेसाठी सोडले त्याचा मला प्रचंड राग आला होता. माझ्या वडिलांना आमच्यापासून दूर केल्यामुळे सोनी यांचा मी तिरस्कार करायला लागले होते. त्यांचे नाव देखील कोणाच्या तोंडून ऐकले की माझा पारा चढायला. पण या सगळ्यातून मला माझ्या आईने बाहेर काढले.

या मुलाखतीत पूजाने पुढे सांगितले होते की, माझ्या आईने या सगळ्या गोष्टींचा मला प्रॅक्टिकली विचार करायला सांगितला. माझे वडील खूप चांगले असल्याचे तिने मला समजावून सांगितले. माझ्या आणि तुझ्या वडिलांच्या नात्यात कटूता निर्माण झाली याचा अर्थ ते वडील म्हणून वाईट आहेत असे होत नाही. 

पूजा सध्या महेश भट यांच्यासोबत सडक 2 मध्ये काम करणार आहे. या चित्रपटात आलिया देखील दिसणार आहे. महेश भट यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटात पूजाने काम केले आहे. पहिल्यांदाच आता पूजा, महेश आणि आलिया एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली असून या चित्रपटात  संजय दत्त, आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 


Web Title: Pooja Bhatt resented her father Mahesh Bhatt for leaving her mother for another woman
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.