विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 06:19 PM2020-07-17T18:19:26+5:302020-07-17T18:20:10+5:30

अभिनेत्री पूजा बेदीने तिच्या विजेच्या बिलाबद्दल ट्विट केले आहे ज्यात तिने विजेचे बिल पाहून हैराण झाल्याचे सांगितले.

Pooja Bedi was happy as the electricity bill came down, she fell asleep after seeing the amount on the new bill | विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप

विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बरेच लोक घरातच कैद आहेत. तर काही जण ऑफिसचे काम घरातूनच करत आहेत. मात्र सध्या लोकांसाठी नवीन डोकेदुखी ठरली आहे ती म्हणजे विजेचे बिल. मुंबईत विजेच्या बिलामुळे सर्व सेलिब्रेटी त्रस्त झाले आहेत. दुप्पट तिप्पट बिल पाहून सेलिब्रेटी हैराण झाले आहेत. नुकतेच तापसी पन्नू, वीरदास आणि अर्शद वारसी यांची विजेचे बिल पाहून झोप उडाली होती. त्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता. आता या यादीत अभिनेत्री पूजा बेदीच्या नावाचाही समावेश झाला आहे. पूजा बेदीने बिलाबाबत ट्विट केले आहे. मुंबईत नसतानाही इतके बिल पाहून ती हैराण झाली आहे.


पूजा बेदी हिने ट्विट केले की, मी उगाचच आनंद व्यक्त केला होता. या महिन्यात माझे विजेचे बील आठ हजारांवरुन थेट 32250 रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये नसताना मला इतके बिल आले आहे. हे कल्पनेच्या पलिकडले आहे.  पूजाच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर चर्चा होते आहे.


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तापसी पन्नू आणि रेणुका शहाणे यांनी वीज बिल जास्त आल्याची तक्रार केली होती.

त्यानंतर आता पूजा बेदी देखील वाढीव वीज बिलामुळे वैतागली आहे. त्यात पूजा बेदीने गेल्या महिन्यात वीज बिल कमी आल्यामुळे आनंद व्यक्त केला होता. मात्र यावेळी वीज कंपनीने तिला अधिक बिल पाठवून तिच्या आनंदावर विरजण पडले आहे.  

Web Title: Pooja Bedi was happy as the electricity bill came down, she fell asleep after seeing the amount on the new bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.