"लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण", पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 03:31 PM2021-04-16T15:31:24+5:302021-04-16T15:37:27+5:30

लॉकडाऊन दरम्यानही अनेक सेलिब्रेटी इतर देशात इतर राज्यात व्हॅकेशनचा आनंद लुटताना दिसतायेत.अनेकांनी तर लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच मुंबई सोडली आहे.

Pooja Bedi Troll On Social Media for Her Goa Video On Lockdown Mask | "लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण", पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

"लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण", पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आला होता.लॉकडाऊन दरम्यानही अनेकजण काहीही काम नसताना देखील रस्त्यावर फिरायचे.काही जण तर सुट्टी मिळाल्याच्या आनंदात कुटुंबासोबत बाहेर वेळ घालवत होते. ही अवस्था अतिशय भीषण असून याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील असे म्हणत सरकारी व्यवस्थेवर पूजा बेदीने टिका करत जुहू चौपाटीवरचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी पूजा बेदीचा मुद्दा अनेकांंना पटला होता. गेल्या वर्षी इतरांना कोरोनाचे गांभिर्य नसल्याचे सांगणारी तीच पूजा बेदी एका वर्षात इतकी बदलली की,घराबाहेर पडत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

अभिनेत्री पूजा बेदी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती वादाच्या भोवऱ्यातसुद्धा अडकते. सध्या पूजा बेदी आपल्या गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. पहिल्यांदाच पूजा बेदी ट्रोल होतेय असं नाही.याआधीही अनेकवेळा तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. सध्या पुजा बेदी गोव्या व्हॅकेशन एन्जॉय करतेय. फुल ऑन मस्ती धमाल करतानाचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यावेळी तिचा एक व्हिडीओ पाहून चाहत्यांचा मात्र चांगलाच संताप होता आहे.

 

व्हिडीओत पूजाने म्हटलंय की,कोरोना व्हायरल कित्येकवर्ष आपला पिछा सोडणार नाही. त्यामुळे आता आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार आहे. कोरोनाला घाबरुन न जाता आपले आयुष्य मनमोकळेपणाने जगा, कोरोनाला घाबरुन घरात बसून स्वतःचे आयुष्य असे घालवू नका, काळजी जरुर घ्या, मास्क लावा पण भीतीपोटी घरातच अडकून पडू नका. मृत्यू यायचा असेल तर तो घरात बसूनही येतो. मृत्यूने गाठण्यापूर्वी आयुष्याचा पुरेपुर आनंद लुटा.

पूजा बेदीचं म्हणणं अजिबात पटलेलं नाहीय. कोरोनाची संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढते. अशात सरकाराने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध लावले आहेत.सर्वसमान्य जनतेचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे.मात्र सेलिब्रेटींना कोरोनाची अजिबात भीतीच नसल्याचेच दिसतंय. लॉकडाऊन दरम्यानही अनेक सेलिब्रेटी इतर देशात इतर राज्यात व्हॅकेशनचा आनंद लुटताना दिसतायेत.अनेकांनी तर लॉकडाऊन जाहीर होण्याआधीच मुंबई सोडली आहे.पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तिच्या या व्हिडीओवर टीका करताना दिसत आहेत.

 

Web Title: Pooja Bedi Troll On Social Media for Her Goa Video On Lockdown Mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.