पूर्वीपेक्षाही अधिक बोल्ड झाले 'हे' कपल, अशा अवतारात समोर आले दोघे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 07:45 PM2019-10-01T19:45:49+5:302019-10-01T19:46:03+5:30

पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला.

Pooja Batra Shares Bold Red Bikini Picture With Husband Nawab Shah | पूर्वीपेक्षाही अधिक बोल्ड झाले 'हे' कपल, अशा अवतारात समोर आले दोघे

पूर्वीपेक्षाही अधिक बोल्ड झाले 'हे' कपल, अशा अवतारात समोर आले दोघे

googlenewsNext

यापूर्वी पूजा आणि नवाबने एक बोल्ड फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. पूजा बत्रा दीर्घकाळापासून अभिनेता नवाब शाहला डेट करत होती. पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात कमबॅक केले होते. पण तिला फारसे यश मिळाले नाही.
 सतत त्यांचे रोमँटीक फोटो ते दोघे सोशल मीडियावर शेअर करायचे.

 

एकत्र क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसायचे. अखेल 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. ताज्या फोटोत  नवाब आणि पूजा अगदी रोमँटीक मुडमध्ये दिसत असून त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.  

या फोटोत पूजा रेड बिकीनीत तर नवाब तिच्यासमोर शर्टलस होत पोज देताना दिसतोय. हा बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेहमीच या दोघांचे बोल्ड फोटो शेअर होत असल्यामुळे पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशा कमेंटसही त्यांच्या फोटोवर नेटीझन्स करताना पाहायला मिळत आहेत.

पूजाचे अभिनेता अक्षय कुमारसोबतचे अफेअर देखील चांगलेच गाजले होते. पूजाच्या मॉडलिंगच्या दिवसांपासून ती अक्षयला ओळखत होती. आजही पूजा आणि अक्षय यांच्यातील मैत्री कायम आहे. पूजाच्या २०१७ ला प्रदर्शित झालेल्या ‘मिरर गेम’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अक्षयने आवर्जून उपस्थिती लावली होती. 

Web Title: Pooja Batra Shares Bold Red Bikini Picture With Husband Nawab Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.