ठळक मुद्देउत्तर प्रदेशमध्ये तिच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

सोनाक्षी सिन्हा सध्या पर्सनल लाईफपेक्षा प्रोफेशनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार गतवर्षी सप्टेंबर महिन्यात सोनाक्षीला एका स्टेज शोमध्ये परफॉर्म करायचे होते. त्यासाठी तिने 24 लाखांची रक्कम घेतली होती मात्र सोनाक्षी या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली नसल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात येतो आहे. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तिच्यावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   
मुरादाबादमध्ये पोलीस या केस संदर्भात सोनाक्षी सिन्हाची जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत आले आहेत. यासाठी सोनाक्षी राहत असलेल्या परिसरातील पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार मुरादाबाद पोलिसांनी जुहू पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. ज्यावेळी पोलिस सोनाक्षीचा जबाब  नोंदवण्यासाठी तिच्या घरी पोहोचले त्यावेळी सोनाक्षी घरात नव्हती त्यामुळे पोलिस जबाब न घेताच परतले. आता मुरादाबाद पोलिस सोनाक्षीच्या जबाबाची वाट पाहतायेत. रिपोर्टनुसार, पोलिसांची टीम पुन्हा एकदा सोनाक्षीला भेटायला जाऊ शकतात. 


सोनाक्षीच्या टीमकडून हे सगळे आरोप फेटाळण्यात आले आहेत. सोनाक्षीच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व करण्यात आलाचा आरोप त्यांनी केला आहे.   


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, लवकरच सोनाक्षी दबंग 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात  सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे.  सोनाक्षी, सलमान आणि अश्वमी मांजरेकर यांच्यात हे लव्ह ट्रँगल असल्याचे म्हटले जात आहे. 


Web Title: Up police visit sonakshi sinha's house in mumbai for inquiry into alleged cheating case
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.