'गुड न्यूज'बद्दल विराट-अनुष्काला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 11:29 AM2020-09-18T11:29:45+5:302020-09-18T11:45:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना आलेल्या अनेक शुभेच्छांना रिप्लाय दिला. पण विराट कोहली याला त्यांनी दिलेला रिप्लाय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

PM Narendra Modi reply to Virat Kohli would like to congratulate Anushka Sharma and i am sure you will be amazing parents | 'गुड न्यूज'बद्दल विराट-अनुष्काला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; म्हणाले...

'गुड न्यूज'बद्दल विराट-अनुष्काला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; म्हणाले...

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच त्यांचा ७०वा वाढदिवस साजरा केला. अनेक बॉलिवूड कलाकार, क्रिकेटर्ससोबत सर्वांनीच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली याचाही समावेश आहे. त्याच्या शुभेच्छा देणाऱ्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय दिला. पंतप्रधान मोदींनी दिलेला रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांना आलेल्या अनेक शुभेच्छांना रिप्लाय दिला. पण विराट कोहली याला त्यांनी दिलेला रिप्लाय सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा-कोहली २०२१ मध्ये बाळाला जन्म देणार आहेत. आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांना याबाबतच शुभेच्छा दिल्या. विराट कोहली याने  पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देताना लिहिले की, 'देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा'. यावर पंतप्रधान मोदी यांनी रिप्लाय देत लिहिले की, 'धन्यवाद विराट कोहली. माझ्याकडून अनुष्का आणि तुला शुभेच्छा. मला विश्वास आहे की, तुम्ही चांगले पॅरेंट्स व्हाल'.

काही दिवसापूर्वीच अनुष्काने बेबी बंपचा फोटो शेअर केला होता. ज्यात ती समुद्र किनारी दिसली होती.  यात ती तिचं बेबी बंप पाहून हसताना दिसत होती. या फोटोसोबत तिने लिहिले होते की, 'आपल्या आत जीवाच्या निर्माणाचा अनुभव करण्यापेक्षा वास्तविक आणि विनम्र काहीच नाही. जर हे तुमच्या नियंत्रणात नाहीये तर वास्तवात काय आहे?'. यावर विराटने कमेंट करत लिहिले होते की, 'एका फ्रेममध्ये माझं पूर्ण विश्व'.

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत फॅन्सना आनंदाची बातमी दिली होती. त्यांनी सांगितले होते की, नव्या वर्षाच्या सुरूवातील ते आई-बाबा होणार आहेत. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं होतं.

अनुष्काच्या कामाबाबत सांगायचं तर ती शेवटची २०१८ मध्ये आलेल्या 'झिरो' सिनेमात शाहरूख खानसोबत दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. तसेच अनुष्काने तिच्या प्रॉडक्शन हाऊसखाली 'बुलबुल' सिनेमा केला होता. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

हे पण वाचा :

बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काने फोटो केला शेअर, तर विराट म्हणाला - 'माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये'

समुद्र किनारी अनुष्का शर्मा दिसली बेबी फ्लॉन्ट करताना, 45 लाखांहून जास्त लोकांनी फोटोला दिली पसंती

19 चित्रपट त्यातील 3 ठरले फ्लॉप, तरीदेखील इतक्या कोटींची मालकीण आहे अनुष्का शर्मा 

Web Title: PM Narendra Modi reply to Virat Kohli would like to congratulate Anushka Sharma and i am sure you will be amazing parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.