PETA ने केला सोनू सूद आणि श्रद्धा कपूरचा गौरव, ठरले 2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 05:17 PM2020-12-17T17:17:12+5:302020-12-17T17:23:47+5:30

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीं,अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रनोट, शाहिद कपूर आणि रेखा यांचाही  पेटाने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ पुरस्कारने  सन्मानित केले होते.

PETA India Announced Hottest Vegetarians For 2020 Winners Are Sonu Sood And Shraddha Kapoor | PETA ने केला सोनू सूद आणि श्रद्धा कपूरचा गौरव, ठरले 2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन

PETA ने केला सोनू सूद आणि श्रद्धा कपूरचा गौरव, ठरले 2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन

googlenewsNext


रुपेरी पडद्यावरच्या कलाकारांना आपण नेहमी वेगवेगळ्या रुपात पाहतो...मात्र त्यासाठी हे कलाकारही प्रचंड मेहनत घेतात.... वर्षाचे 365 दिवस आनंदी राहण्यासाठी त्यांना घ्यावी लागते विशेष काळजी... त्यासाठी त्यांना कायम फिट राहावं लागतं... त्यांच्या फिट राहण्या मागचं गुपित आहे शाकाहारी खाणं.

 

बॉलीवुडमध्ये बहुतांशी कलाकार शाकाहारी आहेत... त्यासाठी ते खास शाकाहारी डायटसुद्धा फॉलो करतात...अनेक सेलिब्रेटी नॉनव्हेज खाणे सोडून शाकाहारी बनले आहेत. अनेक सेलिब्रेटी फक्त शाकाहारी जेवण करण्यालाच पसंती देतात. याच गोष्टीमुळे सोनू सूद आणि श्रद्धा कपूर  2020 मधील भारतातील हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रेटी म्हणून पेटाने घोषणा केली आहे.

दोघेही न्यू नॉर्मलमध्ये आपल्या चाहत्यांना शाकाहार करण्यासाठी प्रेरीत करत आहेत. त्यामुळेच त्यांना या वर्षीचा पुरस्कार देण्यात आल्याचे पेटाने म्हटले आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीं,अमिताभ बच्चन, मानुषी छिल्लर, सुनील छेत्री, अनुष्का शर्मा, कार्तिक आर्यन, विद्युत जामवाल, कंगना रनोट, शाहिद कपूर आणि रेखा यांचाही  पेटाने ‘हॉटेस्ट व्हेजिटेरियन’ पुरस्कारने  सन्मानित केले होते.

शाकाहारी पदार्थ खाणंही शरीरासाठी आरोग्यदायी आहे. यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.  सेलिब्रिटीं मासांहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. सर्वसामान्याप्रमाणे सेलिब्रेटी मंडळींनादेखील प्राणी फार आवडतात. त्यामुळे स्वतःही मांसाहारी पदार्थ खात नाही आणि इतरांनाही मांसाहारी पदार्थ न खाता फक्त शाकाहारी पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानही शाकाहारी सेलिब्रिटींच्या यादीमध्ये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर सुरुवातीला मांसाहारी पदार्थ खात असे पण काही वर्षांपूर्वी त्याने मांसाहारी पदार्थ खाणं सोडून दिलं असून तो मांसाहारी पदार्थांना हातही लावत नाही. वयाच्या पन्नाशीचा टप्पा पार करूनदेखील आमिर फिटनेसच्या बाबतीत सर्वांवर मात करतो.

बॉलिवूडच्या हिट हिरोंपैकी एक असलेला विद्युत जामवल आपल्या किलर बॉडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बॉडी पाहून अनेकांना वाटतं की, प्रोटीन आणि मांसाहारी पदार्थांचा आधार घेऊन त्याने आपला हा लूक बनवला आहे. पण, खरं तर त्याने व्यायाम आणि शाकाहारी डाएटचाच आधार घेत आपली बॉडी तयार केली आहे.
 

Web Title: PETA India Announced Hottest Vegetarians For 2020 Winners Are Sonu Sood And Shraddha Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.