सारा अली खानला देखील बसला कोरोनाचा फटका, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:07 PM2020-03-17T18:07:14+5:302020-03-17T18:08:09+5:30

कोरानाचा फैलाव भारतात मोठ्य प्रमाणावर झाला आहे.

people asked to cancel sara ali khan starrer atrangi re shoot PSC | सारा अली खानला देखील बसला कोरोनाचा फटका, वाचा काय आहे प्रकरण

सारा अली खानला देखील बसला कोरोनाचा फटका, वाचा काय आहे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्देअतरंगी रे या टीममुळे गावात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांना वाटत असल्याने हे चित्रीकरण रद्द केले जावे अशी मागणी हे गावकरी करत आहेत.

एखाद्या गावात चित्रीकरण सुरू असल्यास गावातील मंडळी नेहमीच खूश असतात. कारण चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांना रोजगार मिळतो. तसेच केवळ मोठ्या पडद्यावर पाहिलेल्या स्टारना समोरासमोर पाहायला मिळते. पण पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे गावातील मंडळी टेन्शनमध्ये आली आहेत. एवढेच नव्हे तर चित्रपटाचे चित्रीकरणच रद्द केले जावे अशी मागणी गावकरी करत आहेत.

चंदौली जिल्ह्यातील इलियामधील खरौझा गावात सध्या अतरंगी रे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने अनेक स्टार तसेच चित्रपटाची संपूर्ण टीम खरौझा गावात दाखल झाली आहे. पण या टीममुळे गावात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांना वाटत असल्याने हे चित्रीकरण रद्द केले जावे अशी मागणी हे गावकरी करत आहेत. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, चित्रीकरणाच्या निमित्ताने अनेक लोक आले आहेत. तसेच चित्रीकरण पाहायला देखील अनेक गावकरी जमा होत आहेत. त्यामुळे आम्हाला कोरोनाचा फैलाव व्हायची भीती वाटत आहे आणि त्यात जिल्हा  प्रशासनाकडून कोरोनाच्या रुग्णांची तपासणी करण्याची कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाहीये. 

सारा अली खान अतरंगी रे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून ती सध्या वाराणसीमध्ये आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून यात तिच्यासह धनुष आणि अक्षय कुमार यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: people asked to cancel sara ali khan starrer atrangi re shoot PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.