बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 12:06 PM2019-08-21T12:06:38+5:302019-08-21T12:07:18+5:30

बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे.

Parineeti Chopra's photo in the bathtub is viral, fans are worried about the photo | बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी

बाथटबमधील परिणीती चोप्राचा फोटो होतोय व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांना वाटतेय काळजी

googlenewsNext

बॉलिवूडची बबली गर्ल परिणीती चोप्रा तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचं शूटिंग लंडनमध्ये होत आहे. परिणीतीचा आगामी चित्रपट हॉलिवूड चित्रपट द गर्ल ऑन दि ट्रेनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा लूक पाहून अंगावर काटा येतो आहे. 

पॉल हॉकिन्सची प्रसिद्ध कादंबरी 'द गर्ल ऑन द ट्रेन'वर बनलेला अभिनेत्री एमिली ब्लंटवर चित्रीत झालेला हॉलिवूडपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'चा हिंदी रिमेक बनत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये परिणीती चोप्रा बाथटबमध्ये बसलेली पहायला मिळते आहे. या फोटोमध्ये तिच्या डोक्याला मार लागलेला असून चेहऱ्याला रक्त व काळवंडलेला दिसतो आहे. डोळ्यात काजळ पसरलेलं दिसतं आहे. हा फोटो थरारक वाटतो आहे. 


परिणीतीचा या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करून म्हचले की, यापूर्वी मी अशी भूमिका कधी केली नव्हती. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी ही खूप कठीण भूमिका आहे.


या चित्रपटातील भूमिकेबद्दल परिणीती चोप्रा म्हणाली की, 'द गर्ल ऑन द ट्रेन'चं चित्रीकरण करताना मला असं वाटतं की मी हॉस्टेलमध्ये डि‍स‍िप्ल‍िप सोबत राहत आहे. साधारण मी चित्रीकरणानंतर दुसरं काम करण्याला प्राधान्य देते. मात्र या चित्रपटावेळी मी दररोज सेटवर परतण्याची वाट पाहत असते. 


परिणीतीचा लूक पाहून चित्रपटाची कथादेखील दमदार असेल. तिचा या चित्रपटातील लूक पाहिल्यानंतर परिणीतीचे चाहते ट्रेलरची वाट पाहत आहेत.


या चित्रपटाशिवाय परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

याशिवाय ती भुज: दि प्राइड ऑफ इंडियामध्येही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Parineeti Chopra's photo in the bathtub is viral, fans are worried about the photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.