​ परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 07:46 AM2018-01-11T07:46:07+5:302018-01-11T13:16:07+5:30

मध्यंतरी परिणीती चोप्रा एका मिस्ट्री मॅनच्या प्रेमात पडल्याची खबर कानावर आली होती.बरेच दिवस परीच्या आयुष्यात  आलेला हा मिस्ट्री मॅन ...

Parineeti Chopra's patches! Re-growing with X-boyfriend !! | ​ परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!

​ परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!

googlenewsNext
्यंतरी परिणीती चोप्रा एका मिस्ट्री मॅनच्या प्रेमात पडल्याची खबर कानावर आली होती.बरेच दिवस परीच्या आयुष्यात  आलेला हा मिस्ट्री मॅन कोण, हे गुलदस्त्यात होते. पण शेवटी या मिस्ट्री मॅनचा चेहरा समोर आला होता. हा मिस्ट्री मॅन दुसरा कुणी नसून करण जोहरचा असिस्टंट डायरेक्टर चरित देसाई असल्याचे बोलले गेले होते.
 ‘ड्रिम टिम टूर’दरम्यान परिणीती आणि चरित या दोघांची ओळख झाली होती. या टूरचे बिहार्इंड द सीन्स व्हिडिओ शूट करण्याची जबाबदारी चरितकडे सोपवण्यात आली होती. याचदरम्यान चरित आणि परी यांची मैत्री जमली होती. भारतात परतल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली आणि पुढे इतकी बहरली की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, अशी चर्चा या काळात रंगली होती. पण आता एक ताजी खबर आहे. होय, ही चर्चा खरी मानाल तर परिणीती आता   चरितला सोडून पुन्हा एकदा तिचा जुना प्रियकर मनीष शर्मा याच्याकडे परतली आहे. मनीष हा पेशाने दिग्दर्शक आहे.चरित आयुष्यात येण्यापूर्वी परी व मनीषचे ब्रेकअपची खबर होती. पण गत आठवड्यात परी व मनीष पुन्हा एका पार्टीत एकत्र दिसले. यानंतर गेल्या काही दिवसांत या दोघांच्या गाठीभेटी वाढू लागल्याची खबर आहे.



ALSO READ : परिणीती चोप्राला हिरोईन बनण्यात नव्हता जराही इंटरेस्ट!

  मनीष व परिणीत दोघेही अनेक वर्षे परस्परांना डेट करत होते. परी बॉलिवूडमध्ये आली तेव्हापासून या बातम्यांची चर्चा आहे. मनीष शर्माच्याच चित्रपटातून परीने बॉलिवूड डेब्यू केला होता.यानंतर मनीष शर्मा याच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्येही परी दिसली होती. पुढे हे व्यावसायिक नाते प्रेमात बदलले होते. अर्थात परिणीतीने आजपर्यंत कधीही हे मान्य केले नाही. मनीषनेही या नात्यावर बोलणे टाळले होते. मनीष व माझ्यात केवळ मैत्री आहे,असेच परी व मनीष दोघेही आजपर्यंत सांगत आलेत. पण बॉलिवूडमधील बहुतेकांचे म्हणणे ऐकाल, तर यांच्यात मैत्रीपेक्षा अधिक काही असल्याचेच ऐकायला मिळत आले आहे. आता तर हे प्रेम पुन्हा एकदा बहरू लागले आहे.

Web Title: Parineeti Chopra's patches! Re-growing with X-boyfriend !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.