ठळक मुद्देपरिणीतीने हा चित्रपट नाकारल्यावर यात दीपिका पादुकोणची वर्णी लागली.  ‘पीकू’मध्ये तिने अमिताभ बच्चनच्या मुलीची भूमिका साकारली आहे.

परिणीती चोप्रा हिने फार कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये परीने काही हिट सिनेमे दिलेत तर काही फ्लॉप. पण एक सिनेमा नाकारला नसता तर परिणीतीच्या हिट सिनेमांच्या यादीत एकाची भर पडली असती, हे नक्की. परिणीतीला आजही हा एक चित्रपट नाकारल्याचा पश्चाताप होतो. अगदी राहून राहून होतो. हा चित्रपट कुठला तर ‘पीकू’.


होय, २०१५ साली प्रदर्शित झालेला आणि दीपिका पादुकोण हिला अनेक पुरस्कार मिळवून देणारा  ‘पीकू’ हा चित्रपट आधी परिणीतीला ऑफर झाला होता. पण परिणीतीने हा चित्रपट करण्यास नकार दिला. अलीकडे खुद्द परीने हा खुलासा केला. नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये परी यावर बोलली.

 ‘पीकू’ न केल्याचा मला आजही पश्चाताप होतो. अर्थात मी स्वत: हा चित्रपट सोडला नव्हता. माझ्यामते काहीतरी कन्फ्युजन झाले होते. हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी दुस-या एका चित्रपटात बिझी होते. त्यामुळे मी  ‘पीकू’ला नकार दिला आणि मीच माझे नुकसान करून बसले, असे परिणीती म्हणाली.
परिणीतीने हा चित्रपट नाकारल्यावर यात दीपिका पादुकोणची वर्णी लागली.  ‘पीकू’मध्ये तिने अमिताभ बच्चनच्या मुलीची भूमिका साकारली आहे. सुजीत सरकार दिग्दर्शित हा चित्रपट हिट ठरला होता. यातील दीपिकाच्या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते.


 ‘पीकू’बद्दल बोलताना दीपिका एका मुलाखतीत म्हणाली होती की, हा चित्रपट मला मिळणे हे मी माझे भाग्य समजते. माझी भूमिका लोकांना खूप आवडली. वडिलांची सेवा करणारी एक मुलगी लोकांना आवडली. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण मला दत्तक घेऊ इच्छित होते.


Web Title: parineeti chopra revealed deepika padukone was not the first choice for piku
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.