ठळक मुद्देया व्हिडीओमध्ये सिनेमाची टीम धमाल मस्ती करताना दिसतेयपंकज त्रिपाठी या सिनेमाची भाग बनून खूपच खुश आहे

सध्या रणवीर सिंग८३ सिनेमाच्या टीमसोबत मोहालीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतोय. या दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये सिनेमाची टीम धमाल मस्ती करताना दिसतेय. तसेच कपिल देव रणवीर सिंगला क्रिकेटमधले बारकावे शिकवताना दिसतायेत. विश्वविजेत्या क्रिकेट टीममधील दिग्गज ८३ या चित्रपटामधील कलाकारांना क्रिकेटचे प्रशिक्षण धर्मशाला येथे देत आहेत.


रणवीर सिंगसोबत पहिल्यांदा पंकज त्रिपाठीपण दिसला. पंकज त्रिपाठी यात भारतीय क्रिकेट संघाचे मॅनेजर मान सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंकज त्रिपाठी या सिनेमाची भाग बनून खूपच खुश आहे. पंकज त्रिपाठी यांनी 'गँग ऑफ वासेपूर'मध्ये 'सुल्तान'मधील भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 


क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता.अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 


माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे यात दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारणार आहे. साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात मराठी अभिनेता चिराग पाटील त्याचे वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. . हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल, २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

Web Title: Pankaj tripathi joins 83 team in dharamshala ranveer singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.