first look: ‘पल पल दिल के पास’चे पोस्टर पाहून तुम्हाला आठवेल सनी देओलचा ‘बेताब’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 12:32 PM2019-02-14T12:32:18+5:302019-02-14T12:33:59+5:30

९० च्या दशकातला सुपरस्टार सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. करणचा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय.

pal pal dil ke paas first look sunny deol introdues son karan deol and his actress sahher bambaa | first look: ‘पल पल दिल के पास’चे पोस्टर पाहून तुम्हाला आठवेल सनी देओलचा ‘बेताब’!!

first look: ‘पल पल दिल के पास’चे पोस्टर पाहून तुम्हाला आठवेल सनी देओलचा ‘बेताब’!!

googlenewsNext
ठळक मुद्देसनी आणि अमृता सिंगच्या पहिल्यावहिल्या ‘बेताब’ या चित्रपटाची आठवण करून देणारे ‘पल पल दिल के पास’च्या या पोस्टर पोस्टरमध्ये करण देओल पापा सनी देओलप्रमाणे काहीशा लाज-या अंदाजात दिसतोय. तर सहर एकदम फ्रेश आणि सुंदर दिसतेय. 

९० च्या दशकातला सुपरस्टार सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. करणचा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय. सनी पाजीच्या मुलाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच मोठी प्रतीक्षा केली. पण ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. होय, येत्या १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.




करणसोबत सहर बाम्बा ही सुद्धा या चित्रपटातून डेब्यू होत आहे. मुळची हरियाणाची असलेली  सहर टाईम्स फ्रेश फेस २०१६ ची विजेती आहे व सध्या मुंबईत शिक्षण घेत आहे.





सनी आणि अमृता सिंगच्या पहिल्यावहिल्या ‘बेताब’ या चित्रपटाची आठवण करून देणारे ‘पल पल दिल के पास’च्या या पोस्टर पोस्टरमध्ये करण देओल पापा सनी देओलप्रमाणे काहीशा लाज-या अंदाजात दिसतोय. तर सहर एकदम फ्रेश आणि सुंदर दिसतेय. 
ताजी चर्चा खरी मानाल तर करणच्या या चित्रपटात प्रेम चोप्रा यांची मुलगी पुनीताची लेक सांची ही सुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यावरून या चित्रपटात पुन्हा एकदा प्रेमत्रिकोण पाहायला मिळणार, असे मानले जात आहे. अर्थात अद्याप ‘पल पल दिल के पास’च्या कथेबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. खुद्द सनी देओल याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
‘पल पल दिल के पास’ सनी साऊंड्स आणि झी स्टुडिओने प्रोड्यूस केला आहे. मनालीत या चित्रपटाचे शूटींग झाले. मुंबईतही काही भागांचे शूटींग पार पडले.

Web Title: pal pal dil ke paas first look sunny deol introdues son karan deol and his actress sahher bambaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.