पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान लग्नाच्या 5 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. माहिराचे नाव बिजनेसमन सलीम करीमसोबत बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अखेर यावर माहिराने मौन सोडले. पाकिस्तानातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर हसन शहरयार यासीन सोबत सोशल मीडियावर लाइव्हवर तिने याबद्दल सांगितले. 

हसन शहरयार यासीनने माहिराला प्रश्न केला आणि सलीम करीमचे नाव घेतले. तेव्हा माहिरा लाजली. हसनने विचारलं सलीमला पाहिल्यांतर सर्वात आधी मनात काय विचार येतो. यावर बोलताना माहिराने तिची मालिका हमसफरची आठवण काढली.

माहिरा म्हणाली, 'जर तुम्ही विचारत असाल की, मला सलीम आवडतो का. तर मी सांगेन हो, मला तो आवडतो. मला त्याला पाहिल्यानंतर असे वाटते की, मी आयुष्यात काहीतरी चांगले केले असेल म्हणून मला तो भेटला आहे.' यावेळी तिने तिच्याच हमसफर या मालिकेतील एक संवाद बोलून दाखवला. जो सर्वांना खूप आडवला.


सलीमबद्दल सांगायचे झाले तर तो एक बिजनेसमन आहे. तो सिमपैसा नावाचं स्टार्टअप चालवतो. 2017 साली अशा अफवा समोर आल्या होत्या की, दोघांनी टर्कीमध्ये साखरपुडा केला आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


सलीम बिजनेसमन तर आहेच सोबत तो एक डीजे देखील आहे. 2017 साली सलीम आणि माहिरा टॅपमॅड टीव्ही लाँच करताना दिसले होते. याशिवाय माहिरा तिच्या एका फ्रेंडच्या लग्नातही सलीमसोबत आली होती.


याआधी माहिराने 2007 साली अली असकरीसोबत लग्न केले होते. 2015 मध्ये ते विभक्त झाले. माहिराला अलीपासून एक मुलगाही आहे. त्याचे नाव अजलान आहे.

माहिराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने पाकिस्तानमधील अनेक मालिका आणि सिनेमात काम केले आहे. माहिरा खान पाकिस्तानी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील मोठे नाव आहे. हमसफर या मालिकेतून तिला खूप लोकप्रियता मिळाली. शाहरुख खानच्या रईस या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली.  माहिराचे नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबतही जोडले गेले होते.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Pakistani actress Mahira Khan falls in love again after divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.