Is Pakistani actress Mahira Khan engaged to boyfriend Salim Karim | रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा?
रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा?

ठळक मुद्दे२०१७ मध्ये माहिरा खान व रणबीर कपूर यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते.

कधीकाळी रणबीर कपूरसोबत असलेल्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे, तिचे सध्याचे रिलेशनशिप. होय, माहिरा खान सध्या सलीम करीम याला डेट करत असल्याची चर्चा आहे. केवळ इतकेच नाही माहिरा व सलीम यांनी साखरपुडा केल्याचेही मानले जात आहे. 
तूर्तास माहिरा व सलीमचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोनंतर दोघांचा सारखरपुडा झाल्याच्या बातम्या जोरात आहेत. एका पार्टीत माहिरा व सलीम  यांचा साखरपुडा झाला. यावेळी दोघांचेही कुटुंबीय हजर होते, असे कळतेय. अर्थात माहिरा व सलीम यापैकी कुणीही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सलीम हा ‘सिम्पासा’ नामक एका स्टार्टअप कंपनीचा सीईओ आहे. याशिवाय तो डीजे आहे. २०१७ मध्ये माहिराने सलीमसोबत मिळून ‘टॅपमॅड टीव्ही’ नामक टेलिव्हिज अप्लिकेशन लॉन्च केले होते. अलीकडे माहिराने एका मित्राच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या लग्नात सलीम आणि माहिरा दोघांनीही हजेरी लावली होती.  

२०१७ मध्ये माहिरा खान व रणबीर कपूर यांचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावरचे काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमेºयाने टिपले होते.   हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरच्या या ‘लव्ह बाईट्स’चा चांगलाच बोभाटा झाला होता. पाकिस्तानी जनतेने  ााहिराला जाम फैलावर घेतले होते. ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’ अशा प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्या होत्या. 


Web Title: Is Pakistani actress Mahira Khan engaged to boyfriend Salim Karim
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.