One beaten by Mahesh Manjrekar | महेश मांजरेकर यांच्याकडून एकाला मारहाण, गुन्हा दाखल

महेश मांजरेकर यांच्याकडून एकाला मारहाण, गुन्हा दाखल


टेंभुर्णी (जि. सोलापूर) : सोलापूर-पुणे महामार्गावर समोरच्या वाहनचालकाने अचानक ‘ब्रेक’ दाबल्याने पाठीमागून येणारे वाहन धडकले. यातील एक गाडी अभिनेते महेश मांजरेकर यांची होती. त्यांनी गाडीतून उतरून नुकसानभरपाईची मागणी करत टेंभुर्णीतील कैलास सातपुते यांना मारहाण केली. यावेळी पोलीस ठाण्याला चला म्हणताच त्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात मांजरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

सातपुते यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री कैलास सातपुते हे आपल्या चारचाकी गाडीतून पुण्याकडून टेंभुर्णीकडे येत होते. यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर ते आले असता एक महागडी चारचाकी गाडी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आली. परंतु या गाडीच्या पुढे टमटम असल्याने चालकाने अचानक ‘ब्रेक’ दाबला आणि गाडी जागेवर थांबली. त्यामुळे या गाडीला पाठीमागून सातपुते यांची चारचाकी धडकली. दोन्ही गाड्या थांबल्यानंतर ‘त्या’ महागड्या गाडीतून अभिनेते महेश मांजरेकर आणि त्यांचे साथीदार खाली उतरले. यावेळी नुकसानभरपाईची मागणी करून ते सातपुते यांना मारहाण करू लागले. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One beaten by Mahesh Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.