बाबो, शेहनाज गिलने दिली सगळ्यांना 'गुड न्युज', बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:50 PM2021-03-13T13:50:08+5:302021-03-13T13:52:10+5:30

Shehnaaz gill flaunts baby bump: शेहनाज गिलचा बेबी बंम्प फोटो पाहून चाहतेही तिला म्हणातयेत ''हौसला रख'', फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

OMG: Shehnaaz Gill Flaunts her baby Bump in latest pics but it's not the way it looks. Read here | बाबो, शेहनाज गिलने दिली सगळ्यांना 'गुड न्युज', बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

बाबो, शेहनाज गिलने दिली सगळ्यांना 'गुड न्युज', बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून शेहनजा गिलने सिद्धार्थ शुल्कासह गुपचूप लग्न केल्याच्या वाववड्या उठल्या होत्या.यावर इतकी चर्चा झाली की शेवटी सिद्धार्थ शुक्लाला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. या चर्चांना काही अर्थ नसल्याचं आता खुद्द सिद्धार्थ शुक्लानं म्हटलं होतं. त्यानं शेहनाज गिलसोबतच्या लग्नासंदर्भातल्या चर्चेवर खुलासा करत  लग्न झालं नसल्याचं सांगितले होते.

आता पुन्हा एकदा शेहनाजने तिचा नवीन फोटो शेअर करत चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्काच दिला आहे. या फोटोत तिने बेबी बंम्प फ्लॉन्ट केल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिच्याबरोबर सिद्धार्थ शुक्ला नाही तर दिलजीत दोसांझ दिसत आहे. हा फोटो पाहून पुन्हा एकदा चाहते संभ्रमात पडले. मात्र दिलजीत दोसांझ आणि शेहनाज यांच्या आगामी प्रोजेक्टचा हा फोटो आहे. 'हौंसला रख' या आगामी सिनेमात शेहनाज दिलजीत दोसांझसह झळकणार आहे. 

नुकतेच या सिनेमाच्या शूटिगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सा-यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रमोशनल पब्लिसिटी स्टंट असल्याचे स्पष्ट आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. तुर्तास या फोटोंवर चाहत्यांनीही शुभेच्छा, लाईक्स आणि भरभरुन कमेंट्स दिल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुर्तास हा सिनेमा पाहण्याची रसिकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. 

नुकतेच शेहनाज गिलला एरअपोर्टवर स्पॉट केले गेले. यावेळी कॅनाडाला ती गेली. कॅनडामध्येही या सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग होणार असल्याचे समजतंय त्यामुळे सध्या शेहनाज कॅनडामध्ये तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.


विशेष म्हणजे शहनाज ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाते. 'बिग बॉस १३' शोनंतर शहनाजचे मेकओव्हर करत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता. अगदी स्लिमट्रीम अंदाजात ती चाहत्यांसमोह अवतरली होती.

 

या नव्या अवतारातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यात ती अगदीच स्लिम दिसत असल्यामुळे तिच्या लूकमध्येही बदल झाला होता.आता म्युझिक अल्बम आणि सिनेमात ती झळकणार आहे. 


 

Web Title: OMG: Shehnaaz Gill Flaunts her baby Bump in latest pics but it's not the way it looks. Read here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.