बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर अशा सेलिब्रेटीजपैकी आहे जो आपल्या फिटनेस व शरीरयष्टीवर जास्त लक्ष देतो. त्याच्या मस्क्युलर बॉडीने फक्त तरूणींनाच नाही तर तरूणांनाही भुरळ पाडली आहे. सध्या शाहिद आगामी चित्रपट कबीर सिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात शाहिद मेडिकल स्टुडंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने १४ किलो वजन   
घटविले आहे. 

कबीर सिंग चित्रपटात शाहिद दोन वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. पूर्वार्धात तो महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे आणि उत्तरार्धात मॅचोमॅनच्या अंदाजात पहायला मिळणार आहे. शाहिद कपूरच्या ट्रेनरने सांगितले की, कबीर सिंग चित्रपटासाठी शाहिदला विद्यार्थ्याचा लूक देण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. सेकंड हाफमध्ये त्याच्या बॉडीवर एवढे काम केले की त्याचे थोडे मस्क्यूलर दिसले.


या दोन्ही लूकसाठी शाहिदने त्याच्या डाएटमध्ये खूप बदल केले. शाहिदच्या ट्रेनरने सांगितले की, २००३ साली प्रदर्शित झालेला इश्क विश्क चित्रपटानंतर आता शाहिद कबीर सिंग चित्रपटात महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी शाहिदने १४ किलो वजन घटविले आहे. वजन कमी करण्यासाठी आणि बारीक दिसण्यासाठी शाहिदने दररोज १४०० ते १५०० कॅलरीचा डाएट घेतला आणि यासोबत कार्डिओ सेशन्स देखील केले.


शाहिद शाकाहारी असून त्याच्या खाण्यात खाद्य पदार्थ जास्त असतात. ज्यात प्रोटीन, एनर्जी व अमिनो अॅसिड भरपूर असतील.

तर वर्कआऊटबद्दल सांगायचे तर शाहिद आठवड्यातील सहा दिवस दररोज दोन तास एक्सरसाईज करतो. यात प्लँक्स, पुशअप्स, डेड लिफ्ट्स, कार्डियो व वेट ट्रेनिंग एक्सरसाईजचा समावेश असतो. शाहिदला डान्स करायलाही खूप आवडते. त्यामुळे देखील त्याची शरिरयष्टी शेप मध्ये राहते.


Web Title: OMG ...! Shahid Kapoor decreased 14 kg of weight, know the secret of his fitness
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.