बॉलिवूडचा दबंग खान सलमान व दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा चित्रपट २०२०च्या ईदला रिलीज होणार होता. मात्र आता या चित्रपटाला ब्रेक लागला आहे. सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अनेक वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार होते. या चित्रपटात आलिया भट आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार होती.पण सलमाननेच या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.  

मागील काही दिवसांतील रिपोर्ट्सनुसार, स्क्रीप्ट बदलल्यामुळे सलमानने चित्रपटात काम करण्यास नकार दिला. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानने चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भटसोबत किसिंग सीनमुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला.


नवभारत टाईम्सशी बोलताना एका जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, संजय लीला भन्साळी व सलमान खानने यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. संजय लीला भन्साळी सलमानला चांगल्या प्रकारे ओळखतो. भन्साळीला हे पण माहित होतं की सलमान किसिंग सीन करायला तयार होणार नाही. इंशाअल्लाहमध्ये कोणताच लिपलॉक सीन नाही. या रिपोर्टमध्ये अजिबात तथ्य नाही. इंशाअल्लाह चित्रपटाचं काम वेगळ्या कारणामुळे थांबवण्यात आलं आहे.


या संपूर्ण प्रकरणावर सलमान मुंबई मिररशी बोलला. तो म्हणाला की, ‘भन्साळींबद्दल मी एवढेच म्हणेल की, ते आपल्या चित्रपटाबद्दल कुठलीही तडजोड करत नाही. मी म्हणेल की, त्यांनी त्यांना हवे तसे चित्रपट बनवावेत. माझ्या मनात भन्साळींबद्दल कुठलीही कटुता नाही. त्यांच्या मनातही असे काही नसेल, अशी आशा करतो. मी भन्साळींची आई आणि त्यांच्या बहिणीच्या अतिशय जवळ आहे. मी भन्साळींच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देईल. भविष्यात आम्ही नक्कीच एकत्र काम करू, इंशाअल्लाह...’

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, नुकतेच संजय लीला भन्साळ हृतिक रोशनला भेटले होते आणि तो त्याच्या चित्रपटात दिसू शकतो आणि लवकरच या चित्रपटाची घोषणा करण्यात येईल.


Web Title: OMG! Salman Khan refused to work in the film due to the kissing scene
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.