OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 09:00 PM2019-04-14T21:00:00+5:302019-04-14T21:00:00+5:30

'किक', 'सुल्तान' आणि 'सरबजीत' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना आपलेसे करणारा अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

OMG ...! Randeep Hooda is love guru of Kartik Aryan | OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू

OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू

googlenewsNext


'किक', 'सुल्तान' आणि 'सरबजीत' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना आपलेसे करणारा अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. रणदीप आता लवगुरू बनला आहे आणि तोही अभिनेता कार्तिक आर्यनचा. हॅंडसम कार्तिक आर्यनच्या फक्त तरूणीच नाही तर अभिनेत्री सारा अली खानदेखील दिवानी आहे.

खरेतर साराच्याच प्रेमात घनचक्कर झाला आहे कार्तिक आर्यन आणि त्यामुळे तो खूप हैराण झाला आहे. त्यासाठी आता तो अभिनेता रणदीप हुडाची मदत घेतो आहे. आम्ही बोलतोय, इम्तियाज अली दिग्दर्शित व कार्तिक आर्यन आणि सारा अली खान अभिनीत लव आज कल चित्रपटाच्या सीक्वलबद्दल. लव आज कल २ मध्ये रणदीप कार्तिकच्या लवगुरूच्या भूमिकेत दिसणार आहे.


आधी अशी बातमी आली होती की रणदीप हुडा या चित्रपटात सारा अली खानच्या वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र रणदीपने हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आणि चित्रपटात कार्तिकला प्रेमाचे सल्ले देताना दिसणार असल्याचा खुलासा केला.


लवकरच रणदीप लव आज कल २ चित्रपटाच्या शूटिंगसाठी उदयपूरला जाणार आहे. त्याचे एक आठवड्यापर्यंत चित्रीकरण चालणार आहे. त्यानंतर तो राजस्थानमधील रथंबोरमध्ये जाणार आहे आणि तिथे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करणार आहे.

रणदीप हुडाला वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करायला खूप आवडते.

या फोटोग्राफीच्या माध्यमातून जो काही निधी जमतो. त्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी करतो.

Web Title: OMG ...! Randeep Hooda is love guru of Kartik Aryan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.