OMG !! ​प्रमोशनल इव्हेंटमध्ये श्रुती हासनसोबत घडले कल्पनेपलीकडे असे काही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2017 05:36 AM2017-06-01T05:36:08+5:302017-06-01T11:07:47+5:30

श्रुती हासन सध्या ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दिल्लीला आली होती. याचदरम्यान ...

OMG !! In the promotional event, Shruti Hassan has some ideas about something like that! | OMG !! ​प्रमोशनल इव्हेंटमध्ये श्रुती हासनसोबत घडले कल्पनेपलीकडे असे काही!

OMG !! ​प्रमोशनल इव्हेंटमध्ये श्रुती हासनसोबत घडले कल्पनेपलीकडे असे काही!

googlenewsNext
रुती हासन सध्या ‘बहन होगी तेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती दिल्लीला आली होती. याचदरम्यान एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान असे काही घडले की, श्रुतीनेही त्याची कल्पना केली नसेल. होय, या प्रमोशनल इव्हेंटमध्ये श्रुतीला कल्पनेपलिकडचे तितकेच अनपेक्षित असे ऐकायला मिळाले.
होय, श्रुती मीडियाशी बोलत होती. याचदरम्यान एका मोठ्या मीडिया हाऊसच्या महिला पत्रकाराने श्रुतीला तिच्या आईच्या नावाने हाक मारली. होय, चक्क सारिकाच्या नावाने. श्रुतीला तिच्या आईच्या नावाने संबोधले जाणे, सगळ्यांसाठीच आश्चर्यचकित करणारे होते. श्रुतीसाठी तर आणखीच. मग काय, सगळीकडे एकच खसखस पिकली. श्रुतीही या महिला पत्रकाराच्या या कारनाम्यानंतर स्वत:चे हसू रोखू शकली नाही. हसू कसे रोखावे, हेच तिला कळत नव्हते. अर्थात नंतर संबंधित महिला पत्रकाराने ‘स्लिप आॅफ टंग’ म्हणून सारवासारव करताना दिसली. मी तुझ्या वडिलांचे नाव आठवत होती. त्यामुळे माझ्या तोंडून तुझ्या आईचे नाव निघाले, असे या महिला पत्रकाराने सांगितले. अर्थात श्रुतीने फार काही मनावर घेतले नाहीच. या प्रकारानंतर तिने अगदी हसतखेळत मुलाखत पूर्ण केली.



ALSO READ : ​Shock: पोस्टर लॉन्च झाल्यावर श्रुती हासनने सोडला ‘संघमित्रा’!

आत्तापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये मला अनेकदा माझ्या समकालीन अभिनेत्रींच्या नावाने संबोधले गेले. पहिल्यांदा कुणी मला माझ्या आईच्या नावाने संबोधले, असे ती म्हणाली. श्रुती हासनची आई सारिका ही एकेकाळची गाजलेली अभिनेत्री. सारिकाने आपल्या करिअरमध्ये अनेक यादगार सिनेमे दिले आहेत.
‘बहन होगी तेरी’ या चित्रपटात श्रुती हासन व राजकुमार राव ही जोडी प्रथमच एकत्र दिसणार आहे. येत्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटाबद्दल श्रुती कमालीची उत्सूक आहे.

Web Title: OMG !! In the promotional event, Shruti Hassan has some ideas about something like that!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.