बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवरा निक जोनासपासून विभक्त होणार आहे, असे वृत्त एका मासिकात प्रसिद्ध झाले. ब्रिटीश वीकली मॅगझिन ओकेने प्रियंका चोप्रानिक जोनासने घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांमध्ये प्रॉपर्टी व प्रियंकाच्या जीवनशैलीला घेऊन दररोज भांडणे होतात, असे वृत्त प्रसिद्ध केले. मात्र या वृत्तामुळे प्रियंका चोप्राच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.  

या वृत्ताचे रविवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रियंकाचा जोनस कुटुंबासमवेतच्या फोटोने खंडन केले आहे. या बातमीमुळे प्रियंका व निक जोनास खूप भडकले असून त्यांना याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार प्रियंका चोप्रा व निक जोनास ओके मासिकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. प्रियंकाच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, जर प्रियंकाने निगेटिव्ह वृत्ताविरोधात कारवाई करायचे ठरविले तर तिला कोणीच थांबवू शकत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रियंका चोप्रा आपल्या लीगल टीमसोबत चर्चा करते आहे. लवकरच ती कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.


प्रियंका चोप्राच्या लग्नानंतरदेखील एका आंतरराष्ट्रीय मासिकाने निक व प्रियंकाचे लग्न घोटाळा असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्या वृत्तात प्रियंका चोप्राला टार्गेट केले होते. त्यावेळी या वृत्तावर प्रियंकाच्या कुटुंबाने व इंडस्ट्रीतल्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर मासिकाच्या संपादकांनी प्रियंकाची माफीनामा प्रसिद्ध केला होता.

 

त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रियंकाला टार्गेट केले जात असून तिच्या घटस्फोटाचे वृत्त व्हायरल होत आहे. यावर प्रियंका चोप्राची बहिण परिणीती चोप्राने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, हे वृत्त खोटे आहे आणि याबद्दल मला बोलायचे नाही.


Web Title: OMG ...! Priyanka Chopra, Action Against Magazine
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.