OMG...! बेबो करीनाने परिधान केला इतका महागडा टँक टॉप, किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 06:30 AM2019-06-29T06:30:00+5:302019-06-29T06:30:00+5:30

तरूणांमध्ये स्टाईल व फॅशनमुळे चर्चेत असणारी बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर हिचा एका टॉपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

OMG Kareena Kapoor expensive gucci tank top costs more than 100 Tshirts | OMG...! बेबो करीनाने परिधान केला इतका महागडा टँक टॉप, किंमत ऐकून व्हाल हैराण

OMG...! बेबो करीनाने परिधान केला इतका महागडा टँक टॉप, किंमत ऐकून व्हाल हैराण

googlenewsNext


फ्रेंड्समध्ये स्टाइलिश व कूल दिसण्यासाठी चाहते आपल्या आवडत्या स्टारचा ड्रेस व लूक कॉपी करतात. तरूणांमध्ये स्टाईल व फॅशनमुळे चर्चेत असणारी बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर हिचा एका टॉपमधील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टॉपची किंमत खूप जास्त असून या किमतीत एक टॉपचं छोटेसे दुकान टाकू शकता.


करीना कपूर हिने नुकताच लंडनमधील हॅम्पशायर इथला आई बबीता व बहिण करिश्मासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत करिनाने टँक टॉप परिधान केला आहे. तिने या टँक टॉपसोबत नीळ्या रंगाची स्किनी जीन्स आणि ब्राऊन लेदर बुट घातले आहेत. करिनाने परिधान केलेले हे टॉप गुच्ची स्प्रिंग समर कलेक्शनचे असून या टॉपवर स्ट्रॉबेरी प्रिंट आहे. या टॉपवर गुलाबी रंगाची झॅलरदेखील आहे.


करीनाचा हा टॉप दिसायला भलेही साधा असेल पण त्याची किंमत खूप जास्त आहे. या टॉपची किंमत जवळपास ७० हजार रुपये आहे. या बजेटमध्ये ९० ते १०० कॅज्युअल टॉप विकत घेता येतील. 

आमीर खानच्या लाल सिंग लड्ढा या चित्रपटाची घोषणा होऊन कित्येक महिने झाले असले तरी या चित्रपटात नायिका कोण असणार यावर या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते.

पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात करिना कपूर आमिरच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. करिनाच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच चित्रपटाच्या टीमकडून केली जाणार आहे.
 

Web Title: OMG Kareena Kapoor expensive gucci tank top costs more than 100 Tshirts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.