बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने चिखलात माखलेला फोटो केला शेअर, चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:22 PM2021-06-14T18:22:19+5:302021-06-14T18:22:55+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा चिखलात माखलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

OMG ..! The Bollywood actress shared a photo of herself in the mud | बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने चिखलात माखलेला फोटो केला शेअर, चाहते झाले हैराण

बाबो..! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने चिखलात माखलेला फोटो केला शेअर, चाहते झाले हैराण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. नुकताच इंस्टाग्रामवर तिने फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती पूर्णपणे चिखलात माखलेली दिसते आहे. उर्वशी मड बाथ घेते आहे आणि यासोबतच तिने त्याचे फायदेदेखील सांगितले आहेत. तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट्स पहायला मिळत आहेत.

उर्वशी रौतेलाने फोटो शेअर करत लिहिले की, माझा फेव्हरिट मड बाथ स्पा/ मड थेरपी. क्लियोपेट्रा जुनी होती जिला मड बाथ आवडत होते. मॉडर्न फॅन्समध्ये मी सहभागी आहे. बलेरिक बीचच्या लाल मातीची मजा घेते आहे. असे म्हटले जात होते की रोमन प्रेमाची देवी याला आरसा म्हणून वापरत होती. ही मिनरल रिच माती असते ज्यामुळे स्किनसाठी थेराप्युटिक आणि चांगली मानली जाते. 


उर्वशी रौतेला मड बाथचे फायदेदेखील सांगितले आणि लिहिले की, हे डिटॉक्सिफाइड करते. अशुद्धी बाहेर काढते, त्वचा मृदू बनवते. सर्कुलेशन वाढवते आणि दुखण्यावरही आराम देते. उर्वशीच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. तिच्या या पोस्टवर मजेशीर कमेंट्सही पाहायला मिळत आहे. 


उर्वशी रौतला आपल्या सौंदर्यासोबत फिटनेसची देखील तितकीच काळजी घेते. वर्कआउट करतानाचे बरेच व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. कोरोना परिस्थितीत घरात न बसता उर्वशी मदतीसाठी मैदानात उतरली आहे. उर्वशीने देखील समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यासाठी नुकतीच एका फाउंडेशनची सुरुवात केली आहे. या फाऊंडेशनच्या मदतीने स्वत: रस्त्यावर उतरून आता मदत करताना दिसते आहे.

Web Title: OMG ..! The Bollywood actress shared a photo of herself in the mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.