​ OMG !! अनुराग कश्यपवर का आली न्यूयॉर्कमध्ये ‘होस्टेल’वर राहण्याची वेळ? आयफाकडे का फिरवली पाठ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 08:28 AM2017-07-20T08:28:07+5:302017-07-20T14:00:38+5:30

दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेली त्याची कथित प्रेयसी शुभ्रा शेट्टी यांची हळूहळू फुलत असलेली लव्हस्टोरी ...

OMG !! Anurag Kashyap's time to stay at 'hostel' in New York? Why is the text of IIFA? | ​ OMG !! अनुराग कश्यपवर का आली न्यूयॉर्कमध्ये ‘होस्टेल’वर राहण्याची वेळ? आयफाकडे का फिरवली पाठ?

​ OMG !! अनुराग कश्यपवर का आली न्यूयॉर्कमध्ये ‘होस्टेल’वर राहण्याची वेळ? आयफाकडे का फिरवली पाठ?

googlenewsNext
ग्दर्शक अनुराग कश्यप आणि त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असलेली त्याची कथित प्रेयसी शुभ्रा शेट्टी यांची हळूहळू फुलत असलेली लव्हस्टोरी आता कुणापासूनच लपून राहिलेली नाही. मध्यंतरी अनुराग व शुभ्राचे इंटिमेट होत असतानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. यानंतर दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा जोरात सुरु झाली होती. ताजी चर्चा आहे, ती अनुराग व शुभ्राच्या न्यूयॉर्क येथील मुक्कामाची. शिवाय नुकताच पार पडलेला आयफा सोहळा अनुरागने न्यूयॉर्कमध्ये असूनही ‘मिस’ केल्याची. होय, न्यूयॉर्कमध्ये आयफा अवार्डच्या रात्री रंगत असताना अनुराग व शुभ्रा हे दोघेही न्यूयॉर्कमध्येच होते. अगदी आयफा अवार्ड्ससाठी आलेले बॉलिवूड सेलिब्रिटी जिथे थांबले होते, त्याच हॉटेलच्या बाजूला. पण कुठल्याशा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर एका होस्टेलमध्ये. होय, अनुराग व शुभ्रा न्यूयॉर्कच्या एका होस्टेलमध्ये मुक्कामाला होते. (न्यूयॉर्कमध्ये होस्टेलमध्ये राहणे बरेच ‘चीफ’ मानले जाते, हे सांगणे नकोच.) खरे तर दोघेही बिझनेस क्लासने न्यूयॉर्कला गेलेत. पण दोघांनी मुक्काम मात्र न्यूयॉर्कच्या होस्टेलमध्ये केला. एवढेच नाही तर न्यूयॉर्कमध्ये असूनही अनुराग आयफाकडे फिरकला सुद्धा नाही. त्याचे असे होस्टेलमध्ये राहणे आणि आयफाकडे पाठ फिरवणे मग चांगलेच चर्चेचा विषय ठरले. आयफासाठी आलेले बॉलिवूडचे अनेक स्टार याबद्दल कुजबुजतांना दिसले. आता अनुरागच्या या अशा वागण्यामागचे कारण, त्यालाच ठाऊक़  



ALSO READ : ​‘गर्लफ्रेन्ड’ शुभ्रा शेट्टीसोबत इंटिमेट होताना दिसला अनुराग कश्यप!

डिसेंबर २०१५ मध्येच अनुराग व शुभ्राच्या अफेअरच्या चर्चा कानावर आल्या होत्या. दोघेही अनेक इव्हेंटमध्ये एकत्र दिसल्यानंतर या चर्चांना जोर चढला होता. डिझाईनर मसाबा हिच्या संगीत सेरेमनीत स्वत: अनुरागने शु्रभाचा एक फोटो शेअर करत,  ऌङ्म३३्री ं३ ३ँी ६ी्रििल्लॅ असे लिहिले होते. तेव्हापासून अनुराग व शुभ्रा एकमेकांना डेट करत असल्याचे मानले गेले होते. अर्थात अफेअरच्या या बातम्यांनी अनुराग चांगलाच संतापला होता. केवळ संतापलाच नाही तर त्याने या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते. आपले म्हणणे खरे करण्यासाठी अनुरागने एका फोटोचा आधार घेतला होता. या फोटोत आमच्यासोबत अनेक मित्र आहेत. पण मीडिया केवळ माज्यावर व शुभ्रावर फोकस करून वेगळ्याच कहाण्या गढत असल्याचे त्याने म्हटले होते. पण आता कदाचित पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय, असेच म्हणायला हवे. 

Web Title: OMG !! Anurag Kashyap's time to stay at 'hostel' in New York? Why is the text of IIFA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.