OMG! अभिनेत्रीने स्वत:च लीक केला घराचा पत्ता; मग झाले असे काही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 08:00 AM2019-12-19T08:00:00+5:302019-12-19T08:00:02+5:30

ही अभिनेत्री लवकरच यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय.

OMG! Actress manushi chhillar leaked her address on social media | OMG! अभिनेत्रीने स्वत:च लीक केला घराचा पत्ता; मग झाले असे काही...!!

OMG! अभिनेत्रीने स्वत:च लीक केला घराचा पत्ता; मग झाले असे काही...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी मेडिकलची विद्याथीर्नी आहे.

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर लवकरच यशराज फिल्म्सच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. यश राज फिल्सने त्यांच्या ‘पृथ्वीराज’ या सर्वात मोठ्या ऐतिहासिक चित्रपटाची नायिका म्हणून मानुषीची निवड निश्चित केली आहे. तूर्तास मानुषीबद्दल एक वेगळीच बातमी आहे. होय, अजानतेपणी का होईना मानुषीने तिच्या घराचा पत्ता सोशल मीडियावर जाहीर केला आणि मग... आणि मग, तिच्या घरासमोर पुष्पगुच्छांचा जणू गालिछा अंथरला गेला.

होय, एक  भेटवस्तू मिळाल्यानंतर आभार व्यक्त करताना मानुषीने या भेटवस्तूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पण या फोटोसोबत मानुषीच्या घराचा पत्ताही लीक झाला. मग काय, इंटरनेटवर जणू खळबळ माजली. मानुषीच्या कोर टीमच्या ही चूक लगेच लक्षात आली. सुरक्षाकारणास्तव ही पोस्ट लगेच हटवण्यात यावी, अशी विनंती तिच्या टीमने केली. पण ही पोस्ट हटवण्याआधीच ती व्हायरल झाली होती.  चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मग काय, मानुषीच्या घराबाहरे पुष्पगुच्छांची जणू बहार आली.  


मानुषीच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर तिचा आगामी सिनेमा   निर्भीड आणि पराक्रमी राजा पृथ्वीराज यांच्या जीवनावर आणि शौर्यावर  आधारित असेल. तिच्या बरोबर पृथ्वीराज म्हणून सुपरस्टार अक्षय कुमारची निवड करण्यात आली आहे आणि राजा पृथ्वीराजाची प्रेयसी असणा-या देखण्या संयोगिताच्या भूमिकेत मानुषी झळकणार आहे. ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करत आहेत.

२०१७ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटावर नाव कोरणारी मानुषी मेडिकलची विद्याथीर्नी आहे.  मानुषीने मिस फोटोजेनिकचा अवार्डही आपल्या नावावर केला आहे. ती ‘मिस हरियाणा’  राहिली आहे.

Web Title: OMG! Actress manushi chhillar leaked her address on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.