अंकिता लोखंडेला किस करतानाचा सुशांतचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:56 PM2020-09-10T18:56:41+5:302020-09-10T18:58:32+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सातत्यावने चर्चेत येत आहे.

An old video of Sushant kissing Ankita Lokhande is going viral, watch the video | अंकिता लोखंडेला किस करतानाचा सुशांतचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा व्हिडिओ

अंकिता लोखंडेला किस करतानाचा सुशांतचा जुना व्हिडिओ होतोय व्हायरल, पहा व्हिडिओ

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सातत्यावने चर्चेत येत आहे. ती सुशांतला न्याय मिळावा यासाठी सुरूवातीपासून धडपडत होती. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहेत. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले आणि रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली. यादरम्यान सोशल मीडियावर सुशांत व अंकिताचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे.


नुकतेच शेखर सुमनचा मुलगा आणि अभिनेता अध्ययन सुमनने सुशांतला ट्रिब्यूट देत एक इमोशनल गाणे गायले आहे, ज्याचा एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत सुशांत सिंग राजपूत आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांनी एकत्र व्यतित केलेल्या क्षणदेखील आहेत. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'
 

व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ  अध्ययन सुमनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडिओचे व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. हा व्हिडिओ अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की स्पीचलेस. या व्हिडिओत एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान सुशांत अंकिताला किस करताना दिसतो आहे.

हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली

अंकिता आणि सुशांत होते सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत सहा वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. ते दोघे पवित्र रिश्ता मालिकेत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र 2016 ला त्यांचे ब्रेकअप झाले. हे वृत्त ऐकून त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. सुशांतने एका मुलाखतीत अंकितासोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते की, आता या ब्रेकअपबद्दल सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही. याच्यामागे माझे खासगी कारण असू शकते ज्याला ऑफिशिएली सांगण्यामध्ये माझा विश्वास नाही.

मी कधीच म्हटले नाही की ही हत्या आहे - अंकिता

दरम्यान अंकिताने सोशल मीडियावर खूप मोठी पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने लिहिले की, मीडिया वारंवार मला विचारते की मला काय वाटतं ही आत्महत्या आहे की हत्या? हे स्पष्ट करण्यासाठी सांगते की मी कधीच म्हटले नाही की ही हत्या आहे आणि यासाठी कोणता विशेष व्यक्ती जबाबदार आहे. मी नेहमीच माझा मित्र सुशांतच्या न्यायाबद्दल म्हटले आहे आणि मी त्याच्या कुटुंबासोबत उभी आहे. तपास एजेंसीने सत्य समोर आणले पाहिजे.

माझा राज्य सरकार व पोलिसांवर विश्वास

अंकिताने म्हटले की, महाराष्ट्रीयन आणि भारतीय नागरिक असल्याच्या नात्याने माझा राज्य सरकार व पोलीस आणि केंद्रीय सरकारवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मला सर्वांसमोर विधवा आणि सावत्र अशा शब्दांचा वापर केला तेव्हादेखील त्यावर अजिबात उत्तर दिले नाही. मी फक्त 2016 पर्यंत सुशांत आणि त्याच्या मानसिक स्थितीबद्दल सांगण्यासाठी पुढे आली.

अंकिता लोखंडेने रियाला झापलं, म्हणाली - 'इतकं प्रेम होतं तरी ड्रग्स कसं घेऊ दिलं?'
 

रिया आजची रात्रही काढणार जेलमध्ये

सुशांत राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या निर्णयानंतर रियाला पहिली रात्र एनसीबी लॉकअपमध्ये काढावी लागली. रियाने जामीन मागितला असला तरी त्यावेळी कोर्टाने नकार दिला. त्यानंतर रियाची भायखळा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. रियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालय उद्या रिया आणि शोविकच्या जामिनावर आदेश देणार आहे.

Web Title: An old video of Sushant kissing Ankita Lokhande is going viral, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.