बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या केसरी चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 


टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा लवकरच हॉलिवूडचा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये झळकताना दिसणार आहे. या चित्रपटात ती घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार असून हरवलेल्या व्यक्तीच्या शोध घेण्यासाठी सहभागी असते. ती हॉलिवूडपटात एमिली ब्लंटने साकारलेली भूमिका परिणीती साकारणार आहे. या चित्रपटातील या भूमिकेसाठी एमिलीचे समीक्षकांनी खूप कौतूक केले होते. हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन' पॉला हॉकिन्सने लिहिलेल्या कथेवर आधारीत आहे.


परिणीती चोप्रा नव्या अंदाजात या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटासंदर्भात परिणीती म्हणाली की, मला वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. ज्या भूमिकेत मला प्रेक्षकांनी पाहिले नाही, अशा भूमिका मला निभावायच्या आहेत. यासाठी मला खूप तयारी व होमवर्क करावा लागणार आहे. हेच कारण आहे की 'द गर्ल ऑन द ट्रेन' प्रत्यक्षात माझ्या आवडीचा चित्रपट आहे. 


'द गर्ल ऑन द ट्रेन' या चित्रपटात मी दारूड्या आणि चुकीच्या गोष्टींना बळी पडलेल्या महिलेची भूमिका करणार आहे.

यापूर्वी मी अशी भूमिका केलेली नाही, असे परिणीतीने सांगितले.

या चित्रपटाचे दिग्दर्शत रिभु दासगुप्ताने परिणीतीला सांगितले की, ही खूप भावनिक भूमिका असून भयावहही आहे. 


Web Title: Oh wow ...! Parineeti Chopra came to the top of the project
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.