अरे बापरे...! इतकी महागडी बॅग घेऊन न्यूयॉर्कला गेली छपाक गर्ल दीपिका, किंमत ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:26 PM2019-05-07T19:26:02+5:302019-05-07T19:26:30+5:30

बॉलिवूडची छपाक गर्ल दीपिका पादुकोण सध्या तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत आली आहे. दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Oh my God! deepika-padukone-reached-new-york-with-a-costly-bag-will-price-you-will-be-surprised | अरे बापरे...! इतकी महागडी बॅग घेऊन न्यूयॉर्कला गेली छपाक गर्ल दीपिका, किंमत ऐकून व्हाल हैराण

अरे बापरे...! इतकी महागडी बॅग घेऊन न्यूयॉर्कला गेली छपाक गर्ल दीपिका, किंमत ऐकून व्हाल हैराण

googlenewsNext

बॉलिवूडची छपाक गर्ल दीपिका पादुकोण सध्या तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत आली आहे. दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोसोबत दीपिकाच्या हातात असलेली बॅगदेखील सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या बॅगेची किंमत २ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे.


दीपिका नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. यावेळी ती खूप हॉट व ग्लॅमरस दिसत होती. दीपिका नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि तिचे चाहते तिचा लूक फॉलो करताना दिसतात. दीपिका नुकतीच न्यूयॉर्कला जाताना दिसली. तिने द मेट गालामध्ये हजेरी लावली होती. यातील तिच्या लूकची देखील खूप चर्चा झाली.


दीपिकाच्या आऊटफिटबद्दल सांगायचे तर दीपिकाने डेनिमचा जंपसूट परिधान केला होता. यात ती खूप कूल दिसत होते. तिच्यासोबत सेलाइन ब्रॅण्डची ब्लॅक रंगाची बॅग होती. ज्याची किंमत २ लाख ६७ हजार रुपये इतकी आहे. त्यात तिने पिंक रंगाची हिल्स सॅण्डल घातली असून तिच्या लूकला या सॅण्डलने चारचाँद लावले आहेत.


दीपिकाचा लग्नानंतर यंदा पहिला मेट गाला इव्हेंट होता. मागील वर्षी दीपिकाने या इव्हेंटमध्ये अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गर्गने डिझाईन केलेला लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. त्यात ती खूप सिम्पल व सुंदर दिसत होती. तिचा हा गेटअप लोकांना खूप आवडला होता.


दीपिका सध्या छपाक चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाची कथा अ‍ॅसिड अटॅक सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवालवर आधारीत आहे. या चित्रपटात दीपिकाच्या पात्राचे नाव मालती आहे. 

Web Title: Oh my God! deepika-padukone-reached-new-york-with-a-costly-bag-will-price-you-will-be-surprised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.