बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना 'शुभ मंगल सावधान'च्या सीक्वलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या चित्रपटाचा सीक्वल आधीच्या भागापेक्षा खूप चांगला असणार असल्याचे बोलले जात आहे. आधीच्या भागात आयुषमानसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत पहायला मिळाली होती.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची कथा समलैंगिक प्रेमकथेवर आधारीत असणार आहे. या चित्रपटात आयुषमान सोबत दिव्येंदू शर्माला घेण्याबाबत बोलले जात आहे. या सिनेमात आयुषमान अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अद्याप याबद्दल या अभिनेत्याकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून अधिकृतरित्या कोणतेही स्टेटमेंट आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य करणार आहे.


'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय यांचे प्रोडक्शन हाऊस करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाची कथा रुढी परंपरामध्ये अडकलेल्या कुटुंबाभोवती फिरते.

यात जेव्हा कुटुंबात कळते की त्यांचा मुलगा समलैंगिक आहे. विनोदाने परिपूर्ण असणाऱ्या या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील वर्षी २०२०मध्ये सुरूवात होणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप चांगली दाद दिली होती.


दिव्येंदु शर्मा याच्याबद्दल सांगायचे तर तो शेवटचा 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये तो दबंग अवतारात पहायला मिळाला होता. या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

याशिवाय तो शाहिद कपूर अभिनीत बत्ती गुल मीटर चालू चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाला फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर कॉन्सेप्टलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.


Web Title: Oh ...! Aayushman Khurana will be play gay role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.