HOTNESS ALERT : नुसरत भारूचाचे समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 02:18 PM2019-12-15T14:18:15+5:302019-12-15T14:33:09+5:30

नुसरत सध्या व्हॅकेशन मूडमध्ये आहे.

nushrat bharucha shares stunning bikini pictures | HOTNESS ALERT : नुसरत भारूचाचे समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा!

HOTNESS ALERT : नुसरत भारूचाचे समुद्र किना-यावरचे हे बोल्ड फोटो पाहून व्हाल फिदा!

googlenewsNext
ठळक मुद्देनुसरत भारूचा हिच्या  ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते.

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचा हिने कमी कालावधीत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘ड्रीमगर्ल’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्यमान खुराणा मुख्य भूमिकेत होता. पण तूर्तास आम्ही नुसरतच्या चित्रपटांबद्दल नाही तर तिच्या व्हॅकेशनबद्दल सांगणार आहोत. होय, नुसरत सध्या व्हॅकेशन मूडमध्ये आहे.   या व्हेकेशनचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर सध्या कमेंट व लाईक्सचा पाऊस पडतोय.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नुसरत बोल्ड बिकिनी लुकमध्ये दिसत आहे. 


तरंगता ब्रेकफास्ट आणि हा नजारा मला प्रेमळ फिलिंग देत आहे, असे नुसरतने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे. 


समुद्र किना-यावरील हा बिकिनी फोटो नुसरतने शेअर केला आहे. मी त्याच ठिकाणी आहे जिथे मी असायला हवे, असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.
नुसरत भरूचा या फोटोमध्ये समुद्र किना-यावर बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसत आहे. 

मालदीवच्या समुद्र किनाºयावरील नुसरतचा हा बिकिनी लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे.

‘प्यार का पंचनामा’ फ्रेंन्चाईजीमधील आपल्या दमदार अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणारी अभिनेत्री नुसरत भारूचा हिच्या  ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर कमाईने अनेक रेकॉर्ड तोडले होते. अगदी अनपेक्षितरित्या या चित्रपटाने १०८.७१ कोटींची कमाई करत, सगळ्यांना आश्चयार्चा धक्का दिला होता. हा चित्रपट एक सरप्राईज हिट होता. 

Web Title: nushrat bharucha shares stunning bikini pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.