नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:44 PM2021-01-05T17:44:23+5:302021-01-05T17:48:11+5:30

आज नेहा कक्कर इंडियन आयडल या कार्यक्रमाची परीक्षक देखील आहे. पण तिला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते.

not neha kakkar but sandeep acharya was winner of indian idol season 2 | नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

googlenewsNext
ठळक मुद्देसंदीप आचार्यला इंडियन आयडलचे विजेतेपद मिळाले होते. या कार्यक्रमामुळे संदीपला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

इंडियन आयडलचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. इंडियन आयडलच्या दुसऱ्या सिझनमध्ये नेहा कक्कर झळकली होती. नेहाला या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमानंतर तिने एकापेक्षा एक गाणी गात बॉलिवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले. आज नेहा कक्कर इंडियन आयडल या कार्यक्रमाची परीक्षक देखील आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, नेहा कक्करला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. इंडियन आयडल सिझन २ चे विजेतेपद नेहाला नव्हे तर एका दुसऱ्याच स्पर्धकाला मिळाले होते. पण त्याचे काही वर्षांपूर्वी निधन झाले.

संदीप आचार्यला इंडियन आयडलचे विजेतेपद मिळाले होते. या कार्यक्रमामुळे संदीपला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. संदीप हा मुळचा राजस्थानमधील बिकानेर येथे राहाणारा होता. इंडियन आयडलचे विजेतेपद मिळाल्यावर संदीपला सोनीसोबत एक करोडचे कॉन्ट्रक्ट साईन करण्याची संधी मिळाली होती. तसेच संदीपला घेऊन सोनीने एक म्युझिक अल्बम बनवला होता. तसेच त्याला कार देखील मिळाली होती. संदीप इंडियन आयडलमुळे घराघरात पोहोचला होता. पण अचानक त्याचे निधन झाले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

संदीप बिकानेरमध्ये एका लग्नाला गेला होता. तिथे त्याची तब्येत बिघडली.  त्याला लगेचच गुरुग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर कावीळ झाली असल्याचे निदान झाले. पण १५ जानेवारी २०१३ ला त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

संदीपने इंडियन आयडलचे विजेतेपद मिळवल्यानंतर परदेशात देखील स्टेज शो केले होते. तो एका शो साठी अडीज ते तीन लाख रुपये घ्यायचा. त्याने इंग्लंड, अमेरिका, दुबई यांसारख्या विविध देशात परफॉर्म केले होते. तो वर्षभरात ६० ते ६५ शो करायचा असे त्याने रेडिफला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.  

Web Title: not neha kakkar but sandeep acharya was winner of indian idol season 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.