ठळक मुद्देपी.टी.उषा यांच्या बायोपिकसाठी दोघांची नाव चर्चेत आहेतया शर्यतीत कोण बाजी मारणार हे आपल्याला लवकरच कळेल

बॉलिवूड अभिनेत्री म्हटल्या की त्यांच्यात कॅट फाईट ही आलीच. सध्या अशीच स्पर्धा लागलीय ती कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिसमध्ये. मात्र यादोघांमध्ये जी स्पर्धा सुरु आहे ती त्यांच्यातील भांडणाला घेऊ नाही तर भूमिकेला घेऊन. त्याचं झालं असे की धावपटू पी.टी.उषा यांच्या बायोपिकसाठी दोघांची नाव चर्चेत आहेत. अर्जुन अवार्ड विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा हिचे बायोपिकाची ऑफर कॅटला आली होती त्यांनतर आता पिंकविलाच्या रिपोर्टनुसार जॅकलीनला सुद्धा या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे.


कतरिनाचा भारत सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे आणि सध्या या सिनेमाच्या यशाचा आनंद घेतेय. कॅटला पी.टी. उषाच्या भूमिकेबाबत विचारले असता ती म्हणाली, ''याबाबत अजून काही ठरलेलं नाही आम्ही यावर चर्चा करतोय. त्यामुळे माझ्याकडे. ''


पिंकविलाच्या रिपोर्टनुसार मेकर्स या भूमिकेसाठी जॅकलिनाच्या नावाचा विचार करत आहे. त्यामुळे आता या शर्यतीत कोण बाजी मारणार हे आपल्याला लवकरच कळेल.

पी.टी. उषावर चित्रपट येणार, अशी चर्चा २०१७ पासून सुरु आहे. आधी या चित्रपटासाठी प्रियंका चोप्राचे नाव चर्चेत होते. पण काही  कारणास्तव पी.टी. उषावरचा हा चित्रपट रखडला. पण आता सुमारे दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे.

दिग्दर्शक रेवती एस वर्मा यांनी पुन्हा एकदा या बायोपिकसाठी कंबर कसली आहे. पी.टी.उषाचा बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.


Web Title: Not just katrina kaif, jacqueline fernandez is also been in race to play athlete pt usha
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.